Malegao News : ज्येष्ठ नेते शरद पवारा यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक आघाडीचे अध्यक्ष महबूब शेख यांनी राज्यातील प्रभारी पदाच्या नियुक्ती केल्या आहेत. यामध्ये मालेगावची जबाबदारी तिसऱ्यांदा शादाब सय्यद यांना देण्यात आली आहे.
मालेगाव शहरातील धार्मिक वातावरण आणि पारंपारिक राजकारणात निधर्मी पक्षाला स्थान निर्माण करणे नेतृत्व पुढे आव्हान राहिले आहे. त्यादृष्टीने ही नियुक्ती एक आव्हान मानले जाते. सय्यद तिसऱ्यांदा नियुक्ती झाल्यावर हे आव्हान कसे पेलतात याची उत्सुकता आहे.
मालेगाव शहरावर माजी आमदार आसिफ सय्यद यांच्या इस्लाम आणि आमदार मौलाना मुक्ती यांच्या नेतृत्वाखाली एमआयएम पक्षात राजकीय तुरस आहे.या नेत्यांच्या पारंपरिक राजकारणात नव्या निधर्मी पक्षाला संधी साधण्याचे आव्हान असते.
राज्यातील ४२ शहरांसाठी महबूब शेख यांनी नव्या नियुक्त्या केल्या आहेत. यामध्ये संदीप कित्ते (नागपूर), गोरख नलावडे (पुणे), प्रशांत बाबर (कोल्हापूर), सौरभ मिश्रा (भंडारा- गोंदिया), तेजस शिंदे (नवी मुंबई), निळकंठ वडमोरे (छत्रपती संभाजी नगर), प्रमोद सर्वदे (मीरा भाईंदर), भरत सौंदाणे (नंदुरबार), प्रवीण लोणकर (चंद्रपूर) आदींचा समावेश आहे.
प्रभारी पदांच्या निवडीनंतर सोशल मीडियावर पोस्ट करत मेहबूब शेख म्हणाले की, राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारधारेनुसार तसेच पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया ताई सुळे आणि विधिमंडळ पक्षनेते जयंतराव पाटीलसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी कार्य कराल, तसेच सर्वसामान्य युवकांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करून युवकांना पक्षाशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पार पाडाल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
तसेच आपण लवकरात लवकर संबंधित जिल्ह्यातील युवक संघटनेचा आढावा घेऊन संघटनात्मक स्थितीचा संक्षिप्त अहवाल प्रदेश कार्यालयास सादर करावा. आपल्या पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा!
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.