

Satara Wai News : माजी मंत्री, दिवंगत नेते मदनराव पिसाळ यांच्या कुटुंबातील जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ, माजी शिक्षण सभापती शशिकांत पिसाळ, विजयसिंह पिसाळ, दीप्ती पिसाळ-मोहिते, बाळासाहेब पिसाळ यांच्यासह वाई तालुक्यातील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत बावधनमध्ये झालेल्या कार्यक्रमात पक्षप्रवेश सोहळा पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासाठी हा धक्का मानला जात आहे. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री मकरंदआबा पाटील यांच्याविरोधात जोरदार मोर्चेबांधणी केली जात असल्याचे बोलले जाते.
यावेळी माजी आमदार मदन भोसले, वाईचे नगराध्यक्ष अनिल सावंत, माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, जिल्हा समन्वयक सुनील काटकर हे उपस्थित होते. यापूर्वी खंडाळा तालुक्याचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वाई विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष डॉ. नितीन सावंत यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आधी सावंत आणि आता पिसाळ यांच्यारुपाने दोन तालुक्यांमध्ये पवारांच्या पक्षाला मोठा धक्का बसला आहे. आता दीप्ती पिसाळ-मोहिते या बावधन गटातून भाजपच्या उमेदवार असण्याची शक्यता आहे.
पिसाळ परिवाराशी पक्ष आणि राजकारणाच्या पलीकडे अनेक वर्षांचे ऋणानुबंध असून, भाजपाच्या विकासाभिमुख राजकारणावर विश्वास ठेवून त्यांनी हा निर्णय घेतला. पिसाळ परिवार व त्यांच्या सहकाऱ्यांचे भाजपात मनापासून स्वागत करण्यात आले. पक्षात त्यांचा सन्मान राखला जाईल आणि भाजप कायम त्यांच्या पाठीशी उभी राहील, असा विश्वास मंत्री गोरे यांनी व्यक्त केला.
अरुणादेवी पिसाळ म्हणाल्या, ‘‘कार्यकर्त्यांच्या इच्छेमुळे भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. त्यामुळे इथून पुढे जनतेला केंद्रबिंदू म्हणून काम करणार आहे.’ यावेळी माजी आमदार मदन भोसले, विजयसिंह पिसाळ, अंकिता कदम यांनी देखील मनोगत व्यक्त केले.
यावेळी प्रसाद सुर्वे, प्रदीप जायगुडे, बापूसाहेब शिंदे, एस. वाय. पवार, सुभाष सोनकर, बावधनच्या सरपंच वंदना कांबळे, चंद्रकांत मांढरे, विकास यादव, विशाल राजापुरे, बाळासाहेब कदम, प्रशांत कदम, विकास भोसले, अशोक पिसाळ, सुभाष घाडगे, माजी सरपंच दीपक पिसाळ यांच्यासह वाई व महाबळेश्वर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.