Nilesh Lanke Vs Sujay Vikhe Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : विखेंच्या शुभेच्छा, लंकेंचा टायगरवाला दम! कॉलर उडवत म्हणाले, 'जो टायगर होता है, वो अकेला आता है'; जिल्हा बँकेत दोघे आमनेसामने

Nilesh Lanke wins the Ahilyanagar DCC Bank election with 64 votes. Sujay Vikhe congratulates him as Lanke makes a bold Tiger remark after victory : नीलेश लंके यांनी विजयाच्या जल्लोषात विखे पिता-पुत्रांचे नाव न घेता साधला निशाणा; सुजय विखे पाटलांनी मात्र लंकेंच्या निवडीचे केले स्वागत, आता एकाच संचालक मंडळात दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी

Pradeep Pendhare

Ahilyanagar District Cooperative Bank Election : अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेत दोन कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर विरोधात बसणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके आणि भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार डाॅ. सुजय विखे पाटील! खासदार लंके यांनी विजयाचा गुलाल उधळताना, काॅलर उडवत दंड थोपटले आहेत. त्याचवेळी सुजय विखे पाटील यांनी जिल्हा बँकेत खासदार लंकेंच्या निवडीचे स्वागत शुभेच्छा दिल्या आहेत. विखे पाटलांनी खासदार लंकेंना दिलेल्या शुभेच्छा पुढील काळ कितपत दूरवर प्रवास करतात, याकडे आता लक्ष असणार आहे.

दरम्यान, खासदार लंके यांनी विजयी सभेत, मी एकटा या निवडणुकीत विजयी झालो असलो, तरी बँकेत काम करण्यासाठी मी एकटाच पुरेसा आहे. तुमच्या आशीर्वादाने चक्रव्यूह भेदून मी विजयी झालो आहे. मी मागच्या दाराने येणारा नाही. ‘जो टायगर होता है, वो अकेला आता है,’ असे म्हणत दम भरला आहे.

जिल्हा बँकेच्या (DCC Bank) निवडणुकीत सेवा सोसायटीच्या पारनेर मतदारसंघातील निवडणुकीकडे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले होते. शरद पवार राष्ट्रवादीचे खासदार नीलेश लंके यांचा सामना पारंपारिक राजकीय प्रतिस्पर्धी भाजपचे विखे पाटील पिता-पुत्रांविरोधात होता. लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा विखे पाटील-लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आमने-सामने आले होते.

मंत्री विखे पाटील यांचे कट्टर समर्थक राहुल शिंदे यांनी खासदार लंकेंसमोर आव्हान उभे केले होते. खासदार लंके (Nilesh Lanke) यांनी देखील लिलया पेलत, 64 मते घेत विजय मिळवला. या विजयावर त्यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी भाजपचे सुजय विखे पाटील यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

सुजय विखे पाटील म्हणाले, "राम शिंदे यांचा कर्जतमधून उमेदवार निवडून आला आहे. त्यांना शुभेच्छा आहेत. खासदार नीलेश लंके यांना देखील निवडीच्या शुभेच्छा आहेत. सहकारात निवडणूक झाली. लोकतांत्रिक प्रक्रियेने निवडणूक झाली. एक गोष्ट आवर्जुन सांगतो की, या निवडणुकीत कुठेही चिखलफेक करण्यात आली नाही. आरोप-प्रत्यारोप झाले नाही. सहकारी बँकेत असलेल्या ठेवीदारांच्या प्रती विश्वास कायम राहावा, याची जबाबदारी सर्वांनीच पाळली."

प्रस्थापित शक्तीविरोधात सर्वसामान्य मतदारांचा विजय

खासदार लंके यांनी विजयानंतर घेतलेल्या सभेत, विखे पाटील पिता-पुत्रांचे आणि सहमीत एक्स्प्रेसमध्ये सहभागी झालेल्या थोरात गटाचे नाव न घेता जोरदार निशाणा साधला. अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सर्व प्रस्थापित शक्ती एकवटलेल्या असतानाही सर्वसामान्य मतदारांच्या पाठबळावर विजय मिळविला आहे. सर्वसामान्य जनतेचा विश्वास आणि कार्यकर्त्यांची निष्ठा हीच आपल्या विजयाची खरी ताकद आहे. बँकेत शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करणार असून, दहशत आणि दादागिरीच्या राजकारणाला भीक घालणार नाही, असा ठाम निर्धार खासदार नीलेश लंके यांनी व्यक्त केला.

...तर लंकेंची मते 70 झाली असती!

विविध पक्षांच्या नेतेमंडळींनी आणि कार्यकर्त्यांनी मदत कशी झाली हे सांगताना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष, एकनाथ शिंदे शिवसेना अशा विविध राजकीय पक्षांतील कार्यकर्ते आपल्या पाठीशी उभे राहिले. माझे कोणाशीही वैर नाही. ज्याच्याशी वैर करतो त्याच्याशी वैरच करतो आणि ज्याच्याशी मैत्री करतो त्याच्याशी मैत्रीच करतो. गद्दारी करणे आपल्या स्वभावात नाही. माझी मते 70 झाली असती; मात्र थोडा उशीर झाला, असेही सूचकपणे खासदार लंके यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT