Nilesh Lanke DCC Bank Election : प्रत्येक डावात बाजी मारणारे नीलेश लंके यावेळी एकाकी! विखे पाटलांनी पारनेरमध्ये ताकद लावली; थोरातांची साथही विरोधात!

Nilesh Lanke faces tough battle Parner Ahmednagar District Bank election Sujay Vikhe Patil and Balasaheb Thorat join forces. Will six key resolutions decide the outcome? जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पारनेरची लढत प्रतिष्ठेची; सुजय विखे पाटलांची रणनीती, राम शिंदे-विवेक कोल्हेंची भूमिका आणि गीतांजली शेळकेंच्या सहा ठरावांवर निकालाचे गणित!
Ahilyanagar District Bank Election
Ahilyanagar District Bank electionSarkarnama
Published on: 
Updated on: 

Ahilyanagar District Central Cooperative Bank Election : अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी 2 नोव्हेंबरला मतदान होत आहेत. तत्पूर्वी अहिल्यानगरच्या सहकारच्या राजकारणात पारनेरमधील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके येथून मैदानात आहेत.

त्यांच्याविरोधात भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे कट्टर समर्थक राहुल शिंदे मैदानात आहेत. खासदार लंके हे निवडणुकीत एकटे लढताना दिसणार आहे. खासदार लंकेंनी जेव्हा-जेव्हा राजकीय गडी बदलला आहे, तेव्हा-तेव्हा विजयाचा चमत्कार घडवला आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत खासदार लंकेंच्या रणनीतीकडे लक्ष लागले आहे.

खासदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांची अहिल्यानगरच्या राजकारणात वाटचाल पाहिल्यास, जेव्हा राजकीय संधी मिळाली त्यात त्यांनी यश मिळवल्याचे दिसते. नीलेश लंके यांची वाटचाल ही शिवसेनेतून झाली. माजी आमदार विजय औटी यांच्याशी फारकत घेत, त्यांनी राष्ट्रवादीत उडी घेतली. थेट पारनेरची आमदारकी खेचून आणली.

राष्ट्रवादी (NCP) फूट पडल्यानंतर त्यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांची साथ दिली. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी अजितदादांची साथ सोडत, शरद पवार यांची साथ स्वीकारली. या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची लंकेंना साथ मिळाली होती. यातून त्यांनी भाजपचे डाॅ. सुजय विखे पाटील यांच्याकडून खासदारकी खेचून घेतली.

Ahilyanagar District Bank Election
Ahilyanagar DCC Bank Election : चिवडा, लाडू, करंजी अन् फटाके! अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत फराळाची रंगत

जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सुरुवातीला दोन्ही बाजूंनी प्रयत्न सुरू होते. परंतु खासदार लंके यांना विखे पाटी गटाचा विरोध कायम राहिला. या निवडणुकीत खासदार लंकेंविरोधात पुन्हा विखे पाटीप पिता-पुत्र, असा पुन्हा सामना रंगताना दिसतोय. पण यावेळची राजकीय परिस्थिती वेगळी आहे. विखे पाटील-थोरात यांची सहमती एक्सप्रेस मैदानात आहेत. सुजय विखे पाटील यांनी पुन्हा एकदा खासदार लंकेंविरोधात शड्डू ठोकला आहे. मतांची जुळवाजुळव करताना दिसत आहे.

Ahilyanagar District Bank Election
Ahilyanagar District Bank Election : नीलेश लंकेंचा जिल्हा बँकेत शड्डू! विखे पाटील गटाची प्रतिष्ठा पणाला; थोरात काय करणार?

खासदार लंकेंमागे थोरातांच्या रूपातील असलेली ताकद यावेळी विरोधात आहे. त्यामुळे लंकेंबाबत निवडणूक काय होणार? अशी एकच चर्चा आहे. दरम्यान, भाजप पक्षांतर्गत मंत्री विखे पाटील यांचे विरोधक आणि भाजपचे जुने कार्यकर्ते-पदाधिकारी नेमक्या कोणत्या भूमिकेत असणार, याकडेही लक्ष असणार आहे. विशेष करून, भाजप विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि आमदार विवेक कोल्हे, यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

विखे पाटलांनी लंकेविरोधात उभी केली ताकद

भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार सुजय विखे हे खासदार लंकेविरोधात जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा शड्डू ठोकून उभे आहेत. त्यांनी पूर्ण ताकद उभी केल्याचे दिसते आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सुजय विखे पाटील बिनविरोध होत आत शिरले आहे. त्यामुळे त्यांना निवडणुकीला समोरे जाण्याचे टेन्शन नाही. मात्र खासदार लंकेंवर मोठा दबाव आहे.

गीतांजली शेळके 'किंगमेकर'च्या भूमिकेत

पारनेरमध्ये 'किंगमेकर'च्या भूमिकेत, गीतांजली शेळके आहेत. जिल्हा बँकेसाठी त्या इच्छुक होत्या. उमेदवारी देखील दाखल केली होती. सुजय विखे पाटील आणि थोरात यांची त्यांनी भेट घेतली होती. पण ऐनवेळी त्यांनी माघार घेतली. त्यांच्याकडे महत्त्वाचे सहा ठराव आहेत. ते पारनेरमध्ये नेमकी काय भूमिका घेतात, याकडे आता लक्ष लागले आहे.

पारनेरमधील मतदार गुवाहाटी सहलीवर

जिल्हा बँकेसाठी पारनेर तालुक्यात 106 पैकी 104 ठराव झाले. चुरशीची लढत होत असल्याने दोन्ही गटांनी मतदार गुवाहाटी, शिर्डी, मुंबई, पुणे, लोणावळा यांसारख्या पर्यटनस्थळांवर सहलीला पाठवले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची सर्व समीकरणे या निकालावर अवलंबून असल्याने विखे पाटील यांच्या गटानेही प्रभावी व्यूहरचना आखली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.