Anita Bhamre & Kirit Somaiyya
Anita Bhamre & Kirit Somaiyya Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

NCP News: अनिता भामरे म्हणाल्या, `किरीट सोमय्याजी कुठे हरवलात`

Sampat Devgire

नाशिक : राज्याच्या (Maharashtra) मंत्रीमंडळाचा शपथविधी झाला. त्यात संजय राठोड (Sanjay Rathore) आणि अब्दुल सत्तार (Abdull Sattar) या दोन वादग्रस्त मंत्र्यांचा समावेष आहे. श्री. राठोड यांच्या विरोधात पुजा चव्हाणच्या (Pooja Chavan) आत्महत्येचा तर श्री. सत्तार यांच्या विरोधात शिक्षक पात्रता परीक्षा (TET) घोटाळ्याचा आरोप आहे. या दोन्ही मंत्र्यांच्या विरोधात बोलण्याची वेळ आली असतांना भाजपचे (BJP) नेते किरीट सोमय्या (kirit Somaiyya) कुठे गायब झाले आहेत. सोमय्याजी हाजीर हो असे आव्हान राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या (NCP) नाशिक शहराध्यक्ष अनिता भामरे (Anita Bhamre) यांनी दिले आहे. (Kirit somaiyya should came forward against Corrupt minister)

महाविकास आघाडीचे सरकार असतांना भाजप नेते किरीट सोमैया रोज उठून सरकार मधील मंत्र्यावर आपल्या मधुर आणि लाघवी आवाजात भष्ट्राचाराचे आरोप करत होते. आज शिंदे फडणवीस सरकार मधील या दोन्ही मंत्र्यांच्या विरोधात गरळ ओकण्याची गरज असतांना किरीट सोमैया नेमक्या कुठल्या बिळात जाऊन लपले. नाही तरी भाजपच्या नेत्यांची एक जूनी सवयच आहे म्हणा की, खोटे बोला पण रेटून बोला. यातून महाविकास आघाडी सरकारची बदनामी करणे एवढा एकच त्यांचा अजेंडा दिसून आला.

(कै) पुजा चव्हाणने आत्महत्या केली की हत्या झाली. यासंदर्भात संजय राठोड विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या आणि चित्राताई वाघ यांनी तर आकाश पाताळ एक केले होते. मग आता मंत्रिमंडळात समावेश करतांना ते दोषी नाहीत का? अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींनी शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) बोगस प्रमाणपत्र मिळवल्यामुळे त्यांची नावे शासनाकडूनच दोषी म्हणून जाहीर केली आहेत, असे असतांना त्यांना मंत्रिमंडळात सामिल केले जाते, यापेक्षा महाराष्ट्राचे दुसरे दुर्दैव काय?.

आता खरी गरज आहे किरीट सोमय्या यांनी आपल्याच भष्ट्राचारी सरकारच्या विरोधात आवाज उठविण्याची. तेव्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आम्ही आव्हान करतो किरीट सोमैया हाजिर हो!

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT