Devidas Pingle & Shivaji Chumbhale
Devidas Pingle & Shivaji Chumbhale Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik APMC : देविदास पिंगळे यांची शिवाजी चुंभळेंवर दणदणीत मात!

Sampat Devgire

Devidas Pingle News : अत्यंत चुरशीच्या व विरोधकांनी तयार केलेल्या दहशतीच्या वातावरणातील नाशिक बाजार समितीची निवडणूक अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार देविदास पिंगळे यांनी जिंकली. पिंगळे यांच्या आपलं पॅनलला बारा तर शिवाजी चुंभळे यांच्या शेतकरी पॅनलला सहा जागा मिळाल्या. त्यामुळे पिंगळे यांनी आपली वीस वर्षांची सत्ता अबाधीत ठेवली. (Nashik APMC election take a serious mode up to last result)

नाशिक (Nashik) बाजार समितीच्या निवडणुकीत (APMC election) राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) पिंगळे (Devidas Pingle) यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेसह (shivsena) महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) पॅनेल होते. त्यांच्या विरोधात शिवसेनेचे शिवाजी चुंभळे आणि भाजपचे (BJP) दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी पॅनल होते. त्यांच्यात चुरशीची लढत झाली.

बाजार समितीच्या या निवडणुकीत सुरवातीपासूनच अत्यंत चुरस होती. श्री. पिंगळे आणि श्री. चुंभळे यांच्यातील राजकीय वाद-विवादामुळे निवडणुकीचे वातावरण तप्त होते. श्री. चुंभळे यांच्या समर्थकांनी अनेक मतदार व नेत्यांना धमकाऊन प्रचारापासून दूर राहण्याच्या तक्रारी होत्या. त्याबाबत पोलिस ठाण्यात दोन तक्रारी दाखल झाल्या आहेत. अशा स्थितीत हा निकाल लागला असल्याने शेवटच्या घडीपर्यंत काय राजकीय घडामोडी घडतील याचा नेम नाही असे बोलले जाते.

श्री. पिंगळे यांच्या नेतृत्वाखालील आपलं पॅनलचे विजयी उमेदवार असे, सर्वसाधारण गट : देविदास पिंगळे (६८०), संपतराव सकाळे (६२१), युवराज कोठुळे (५९८), उत्तम खांडबहाले (५८७), सविता तुंगार (६१३), भास्कर गावित (८९९), निर्मला कड (९९९), जगन्नाथ कटाळे (९५६), विनायक माळेकर (९९३) हे विजयी झाले. पिंगळे यांच्या पॅनेलचे बहिरू मुळाणे (४७४), तुकाराम पेखळे (५१४) हे प्रमुख उमेदवार पराभूत झाले.

शेतकरी पॅनेलचे विजयी उमेदवार असे, शिवाजी चुंभळे (७५३), तानाजी करंजकर (५८९), राजाराम धनवटे (६८९), कल्पना चुंभळे (७१४), धनाजी पाटील (६१३), प्रल्हाद काकड (७०१) हे विजयी झाले. चुंभळे यांच्या पॅनलचे शिवाजी मेढे (४३७), प्रभाकर माळोदे (५६०), नामदेव बुरंगे (४४३), गणेश चव्हाण (५०३) हे तर या निवडणुकीत अनिल ढिकले, गोकुळ पिंगळे, पोपट पेखळे, दिनकर साळवे यांसह सर्व अपक्ष उमेदवार पराभूत झाले.

या निवडणुकीत व्यापारी गटातील श्री. अपसुंदे, जगदीश पाटील आणि हमाल, मापारी गटातील चंद्रकांत निकम हे तीन संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. हे तिन्ही संचालक आपल्याच पॅनलचे आहेत असा दावा श्री. पिंगळे यांनी केला आहे. मात्र या सदस्यांनी मात्र आपण दोन्ही पॅनलचे नसुन तटस्थ आहोत, अशी भूमिका घेतल्याचे बोलले जाते.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी मतमोजणीला प्रारंभ झाला. मात्र दोन्ही पॅनलचे नेते व उमेदवार अतिशय त्वेषाने त्यात सहभागी झाल्याने प्रत्येक मताच्या मोजणीवर ते चौकशी करीत होते. प्रत्येक निकाल लागल्यावर फेरमतमाजणीचा अर्ज दिला जात होता. त्यामुळे मतमोजणीची प्रक्रीया रेंगाळली. सकाळी आठला सुरु झालेली मोजणी शेवटचा निकाल सायंकाळी सहाला जाहीर होईपर्यंत सुरु होती. यावेळी दोन्ही पॅनलच्या समर्थकांत सतत वाद होत होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT