अरविंद जाधव :
Nashik News: नाशिक लोकसभा मतदारसंघाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) शिवसेनेचे इच्छुक उमेदवार विजय करंजकर यांच्या वैयक्तिक भेटीगाठी आणि प्रचार धुमधडाक्यात सुरू आहे. विधान परिषदेतला हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने विजुअप्पांनी आपला मोर्चा लोकसभा मतदारसंघाकडे वळवला. मात्र, 'मातोश्री'चा ग्रीन सिग्नल मिळाल्याशिवाय असा प्रचार केल्याने मला पक्षातून बाहेर काढले होते. तुम्ही तरी जरा सबुरीने घ्या, असा सल्ला राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) इच्छुक उमेदवार शिवाजी सहाणे यांनी दिला. सहाणे यांच्या या सल्ल्याची राजकीय पटलावर चर्चा असून, करंजकर यांनी मात्र अद्याप यावर प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.
लोकसभा निवडणुकीची घोषणा, जागावाटप अद्याप झालेले नाही. मात्र, उमेदवारांच्या भेटीगाठी, अप्रत्यक्ष प्रचार सुरू आहेत. यात उबाठा सेनेचे इच्छुक उमेदवार विजय करंजकर यांचाही समावेश आहे. कधी काळी एकच पक्षात कार्यरत असलेल्या सहाणे यांनी करंजकरांना मात्र सबुरीचा सल्ला दिला आहे.
'मातोश्री'कडून जोपर्यंत उमेदवारी निश्चित होत नाही, तोपर्यंत प्रचार केला म्हणूनसुद्धा पक्षातून काढून टाकण्यात येते. माझ्यावरसुद्धा अशीच कारवाई झाली होती, याची आठवण सहाणे यांनी करून दिली. याबाबत बोलताना सहाणे यांनी सांगितले की, विधान परिषद निवडणुकीतील माझा पहिला पराभव हा एक कट होता, हे जगजाहीर आहे.'
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
'यानंतर मात्र वैयक्तिक प्रचार करतात, निवडणूक लढवण्याची तयारी कशी केली, असे म्हणून मला पक्षातून काढून टाकण्यात आले होते. अर्थात, त्यावेळी संजय राऊत यांना नरेंद्र दराडे भेटले होते. तेथे असेच घडते. मी इकडे पक्ष आपला असे म्हणून काम करीत होतो. अशीच स्थिती आपल्या मित्राची होऊ नये, यासाठी मी फेसबुकवर पोस्ट टाकली.
इकडे माझी पोस्ट पडत असताना तिकडे ठाकरे गटाच्या हातकणंगले जिल्हाप्रमुखांना बडतर्फ करण्याची बातमी समोर आली. परिस्थिती बदलली मात्र मानसिक स्थिती तीच असल्याचा दावा करून आपल्या मित्रपरिवारातील एखाद्याबरोबर असा प्रसंग घडू नये,' यासाठी माझा खटाटोप असल्याचे सहाणे यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) अध्यक्ष अजित पवार यांची भेट झाली. त्यांनी काम सुरू करण्यास सांगितले आहे. मात्र अद्याप जागावाटप निश्चित नाही. त्यामुळे सर्वच घडामोडी डोळ्यासमोर ठेवून नियोजन सुरू असल्याचे सहाणे यांनी स्पष्ट केले.
नगरसेवक पदानंतर त्यांनी विधान परिषदेसाठी दोनदा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही वेळेस मंत्री छगन भुजबळांनी सहाणेंना धोबीपछाड दिला. आता लोकसभेसाठी सहाणे आणि समीर भुजबळ यांच्यापैकी कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
(Edited By Ganesh Thombare)
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.