Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलनाला नाशिकची रसद

Manoj Jarange Patil : तालुक्यामध्ये जनजागृती, धान्य संकलनास सुरुवात
Maratha Reservation
Maratha Reservation Sarkarnama
Published on
Updated on

अरविंद जाधव

Nashik : मराठा आरक्षणप्रश्नी अद्याप ठोस तोडगा निघालेला नाही. त्यामुळे २० जानेवारी रोजी अंतरवाली सराटी येथून मनोज जरांगे-पाटील मुंबईच्या दिशेने कूच करतील. त्याची जोरदार तयारी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सुरू आहे. मुंबई येथेही मोठे आंदोलन उभे राहणार असून राज्यभरातून येणाऱ्या समाजबांधवांसाठी महत्त्वाची जबाबदारी नाशिक जिल्ह्यातून घेतली आहे.

आंदोलनासाठी येणाऱ्या मराठाबांधवांच्या जेवणाची जबाबदारी नाशिक जिल्ह्याने घेतली आहे. यासाठी तालुकास्तरावर जनजागृतीसह धान्य संकलनाची जबाबदारी स्थानिक कमिट्यांवर सोपवण्यात येत आहे. आंदोलनादरम्यान एकाही समाजबांधवाची आबाळ होणार नाही, याची दक्षता घेण्यात येणार असल्याचे नाशिक जिल्हा सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Maratha Reservation
Prakash Ambedkar : महाविकास आघाडीतील समावेशावरून आंबेडकर अजूनही 'वंचित'! काँग्रेस, राष्ट्रवादीवर साधला निशाणा

मनोज जरांगे-पाटील २० जानेवारीला मुंबईला कूच करतील. त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने समाजबांधव असतील. सध्याच्या नियोजनानुसार अहमदनगर, पुणे पुढे नवी मुंबई आणि मुंबई असा जरांगे-पाटील यांचा मोर्चा असणार आहे. २५ जानेवारीला रात्री अथवा २६ तारखेला पहाटे मोठ्या संख्येने मराठा समाजबांधव आंदोलनस्थळी पोहोचतील. त्यानंतर जरांगे-पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपोषण आंदोलनास सुरुवात करतील. मात्र, आंदोलनस्थळी पहिल्याच दिवसापासून मोठ्या संख्येने समाजबांधव येतील.

सर्व समाजबांधव उपोषणात सहभाग घेणार नाही. त्यामुळे आंदोलनस्थळी येणाऱ्या समाजबांधवांची कोणतीही आबाळ होऊ नये, याची दक्षता नाशिक जिल्हा घेणार आहे. नाशिकमध्ये सध्या जनजागृती सुरू आहे. समाजबांधवांकडून फक्त धान्य व तेल संकलित केले जात आहे. यासाठी तालुकास्तरावर कमिट्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. संकलित होणारे अन्नधान्य २४ जानेवारी रोजी एकत्रित करून मुंबईच्या दिशेने रवाना होईल. नाशिक जिल्ह्यातील समाजबांधव २४ तारखेलाच जिल्हा कोर्टासमोरील शिवतीर्थ येथून पायी निघतील.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आंदोलनकर्ते मुंबई-आग्रा हायवेवरील जकातनाक्यापर्यंत पायी, मागे सर्व वाहने असा ताफा असेल. इगतपुरी येथून, इगतपुरीचे समाजबांधव आणि त्यांची वाहने एकत्र येतील. कदाचित सिन्नर तालुक्यातील मराठाबांधवसुद्धा इगतपुरी येथेच नाशिककडून येणाऱ्या समाजबांधवांबरोबर एकत्र येतील. इगतपुरीपासून सर्व वाहनांनी रात्रीच मुंबईत दाखल होतील.

शिवाजी सहाणे यांनी सांगितले की, हे आंदोलन निर्नायकी आहे. त्यामुळे समाजबांधवांचा उत्साह शिगेला आहे. आमच्या एका आवाहनानंतर समाजाकडून मोठ्या प्रमाणावर मदतीचा ओघ सुरू झाला आहे. विशेष म्हणजे फक्त अन्नधान्य, गोडेतेल हीच मदत घेण्यात येत आहे. मुंबईत दररोज राज्यभरातील हजारो समाजबांधव दाखल होतील. त्यांच्या जेवणाची सोय करण्यासाठी आम्ही मैदानाच्या एका कोपऱ्यात स्वयंपाक तयार करणे आणि आलेल्या बांधवांना जेवणे देणे याची सुविधा उभी करणार आहोत. नाशिक जिल्हा ही जबाबदारी नेटाने पार पाडणार असल्याचेही सहाणे यांनी स्पष्ट केले.

(Edited By Roshan More)

R...

Maratha Reservation
Sharad Mohol Murder: गुंड शरद मोहोळ खूनप्रकरणी दोन वकिलांना अटक, पोलिसांची माहिती...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com