Monika Rajale  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Monika Rajale News : भाजपच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा ; आमदार मोनिका राजळेंविरोधात पदाधिकारी एकवटले

Pradeep Pendhare

Ahmednagar News : पाथर्डीतील दुष्काळाच्या राजकीय लढाईत भाजपच्या आमदार मोनिका राजळे हे सध्या तरी एकट्या पडलेल्या दिसत आहेत. पाथर्डीतील दुष्काळाच्या संकटाचा सामना करताना भाजपचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये एकी दिसत नाही. भाजपच्या ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड यांनी पाथर्डी-शेवगावात दुष्काळ जाहीर व्हावा यासाठी बेमुदत उपोषण आंदोलन बुधवारपासून सुरू केले आहे.

शेवगाव पंचायत समितीचे माजी सभापती क्षितिज घुले यांनी दौंड यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आमदार राजळे यांच्यावर टीका करून टार्गेट केले. यावेळी आमदार मोनिका राजळेंच्या (Monika Rajale) निषेधाच्या घोषणांनी आंदोलनस्थळ दणाणून गेले होते.

दुष्काळाच्या संकटात समूह शक्तीने सामोरे गेल्यास त्याची झळ बसत नाही, असे म्हणतात. परंतु राजकारण टिकून राहण्यासाठी दुष्काळाचे भांडवल सध्या पाथर्डीत भाजप (BJP) करत असताना दिसत आहे. पाथर्डी तालुक्याचा दुष्काळच्या यादीत समावेश व्हावा यासाठी सुरूवातीपासून भाजप आमदार मोनिका राजळे, कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी वेगवेगळे निवेदन देताना दिसले. भाजपचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड यांनी पाथर्डी-शेवगावचा दुष्काळाच्या यादीत समावेश व्हावा, यासाठी बेमुदत उपोषण आंदोलन(Protest) सुरू केले आहे.

या आंदोलनाला शेवगाव पंचायत समितीचे माजी सभापती क्षितिज घुले यांनी आंदोलनस्थळी येत पाठिंबा दिला. क्षितिज घुले यांनी पाठिंबा देण्याबरोबर आमदार राजळेंवर जोरदार टिकेचा टायमिंग साधला. दुष्काळासारख्या संवेदनशील मुद्यावर पाथर्डीत राजकीय घमासान सुरू झाल्याचे चित्र आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

क्षितिज घुले म्हणाले, "दुष्काळाच्या गंभीर मुद्यावर सर्व पक्षीय मतभेद बाजूला ठेवून गोळुक दौंड यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहे. पाथर्डीत लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी आहे की नाही, अशी स्थिती आहे. संवेदनशील विषयावर आंदोलन सुरू असताना देखील ते आंदोलनस्थळी फिरकले नाहीत, हे दुर्दैव आहे. सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी येथे आहेत. परंतु नगर-पाथर्डी रस्त्यासाठी दौंड आणि मला आंदोलन करावे लागले.

दुष्काळाच्या गंभीर मुद्यावर सुरू असलेल्या या आंदोलनाची दखल न घेतल्यास मुंबई मंत्रालयात जाऊन गेट बंद आंदोलन करू, असा इशारा क्षितिज घुले यांनी दिला. हक्काचा माणूस नसल्याने आंदोलन करावी लागतात. दुष्काळाच्या योजनांचा लाभ मिळवण्यासाठी या आंदोलात शेवगावमधील राष्ट्रवादी देखील सहभागी असेल, असेही क्षितिज घुले यांनी सांगितले.

गोकुळ दौंड यांच्या आंदोलनस्थळी शेवगाव बाजार समितीचे सभापती एकनाथ कसाळ, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कैलास नेमाने, स्वप्नील देशमुख, अनिल बंड, डाॅ. भास्कर खेडकर, नंदू मुंडे, हनुमान पातळक, किसन आव्हाड, सोमनाथ बोरुडे, रामकिसन शिरसाठ हे उपस्थित होते.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT