Ahmednagar Political News : ऑगस्ट महिना संपत असला तरीही राज्यातील अनेक भागात पावसाने ओढ दिली आहे. परिणामी पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने अनेक ठिकाणची शेतातील उभी पिके जळण्याच्या मार्गावर आहेत. अवर्षणप्रवण असलेल्या नगर जिल्ह्यात यंदा अधिकच गंभीर परस्थिती असल्याने विरोधकांसोबतच सत्ताधारी आमदारही चिंतेत पडले आहेत. ते लोकप्रतिनिधी आपल्या मतदारसंघासाठी सरकारकडे विविध मागण्या करून त्यासाठी पाठपुरवा करताना दिसत आहेत. यामुळे दुष्काळाच्या झळा विरोधकांसह सत्तेतील आमदारांनाही बसू लागल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. (Latest Political News)
कमी पावसामुळे शेवगाव-पाथर्डी मतदातसंघ नेहमीच चिंतेत असतो. जायकवाडी धरणाचे 'बॅकवॉटर' नजरेत असतानाही पाणी उचलण्यात अनेक कायदेशीर आणि तांत्रिक अडचणी आहेत. यातच मतदारसंघातील शेवगाव-पाथर्डी या दोन्ही तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने लोकांच्या अडचणीत वाढ होऊ लागली आहे. यासाठी विविध मागण्यांचा पाठपुरावा करणाऱ्या भाजप आमदार मोनिका राजळे (Monika Rajale) यांनी आपल्या मतदारसंघातील पिकांचे सरसकट पंचनामे करण्याची मागणी केली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना (खरीप २०२३) अंतर्गत पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे आवाहन केले आहे. याबाबत त्यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना निवेदन दिले आहे.
आमदार राजळेंनी कृषिमंत्री धनंजय मुंडेंना (Dhananjay Munde) दिलेल्या निवेदनात म्हटले की, "विधानसभा मतदारसंघातील पाथर्डी तालुक्यात एक लाख २६ हजार २८५ शेतकर्यांनी ५७ हजार ३९५ हेक्टर व शेवगावमधील ९२ हजार ९० शेतकर्यांनी ५३ हजार ३७२ हेक्टरसाठी पीक विमा भरला आहे. दुष्काळामुळे शासननिर्णय पीक विमा मुद्द्यांतर्गत दोन्ही तालुक्यातील सर्व महसूल मंडळाची पीक विमा पंचनाम्यासाठी निवड होणे गरजेचे आहे. मात्र काही मंडळांची निवड झालेली नाही", अशी तक्रारही राजळेंनी केली आहे.
"पर्जन्यमापकाचा निकष न लावता पाथर्डी व शेवगावातील सर्व महसूल मंडळातील पिकांचे पंचनामे होणे गरजेचे आहे. पाथर्डीतील सहा मंडळापैकी फक्त पाथर्डी या एकच मंडळाचा पीक विमा पंचनाम्यासाठी समावेश झाला आहे. तर शेवगाव तालुक्यातील शेवगांव, बोधेगाव, एरडगाव या तीनच मंडळाचा समावेश आहे. पाथर्डीतील माणिकदांडी, टाकळीमानूर, मिरी, करंजी, कोरडगाव तर शेवगांवमधील भातकुडगाव, चापडगाव व ढोरजळगाव ही महसूल मंडळे वगळण्यात आलेली आहेत, याकडेही राजळेंनी कृषिमंत्री मुंडेंना दिलेल्या निवेदनातून लक्ष वेधले आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.