सिन्नरच्या पारंपरिक राजकारणात खासदार राजाभाऊ वाजे आणि क्रीडामंत्री कोकाटे यांचे वर्चस्व कायम आहे.
कोकाटे यांचे बंधू भाजपमध्ये दाखल झाले असून उदय सांगळेही प्रवेशाच्या तयारीत आहेत.
या घडामोडींमुळे महायुतीत फुट पडण्याची शक्यता निर्माण झाली असून सिन्नरचे राजकारण तापले आहे.
Manikrao Kokate Local body Election News : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांचे बंधू भाजपवासी झाले आहेत. येत्या आठवड्यात उदय सांगळे हे दुसरे विरोधक भाजपचा झेंडा हाती घेतील. या घडामोडींमुळे भाजपला अधिक फायदा होण्याची शक्यता आहे.
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत सिन्नर मतदार संघात सात गट आहेत. यातील सिन्नरच्या सहा गटांमध्ये मराठा विरुद्ध वंजारी अशी पारंपारिक लढत होत आली आहे. त्यात क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे आणि खासदार राजाभाऊ वाजे या दोन गटांमध्ये कार्यकर्त्यांची विभागणी झाली आहे.
सिन्नर विधानसभा मतदारसंघात राजकीय पक्ष गौण मानले जातात. प्रत्येक निवडणुकीत कार्यकर्ता दोन गटांमध्ये विभागला जातो. यंदाच्या निवडणुकीतही तीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना मुलगी सीमांतिनी कोकाटे तिचे राजकीय करिअर महत्त्वाचे आहे. सोमठाणे हा त्यांचा पारंपारिक गट आहे. कोकाटे यांचे बंधू भारत कोकाटे यांनी भाजप प्रवेश केला. त्यामुळे या गटात कोकाटे भाजपला जवळ करण्याची शक्यता मावळलीय.
दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत उदय सांगळे यांनी कोकाटे यांना आव्हान दिले होते. सांगळेही येत्या 25 ऑक्टोबरला भाजप प्रवेश करण्याची शक्यता आहे. कोकाटे यांचे दोन्ही कट्टर विरोधकांची आता भाजपवासी होत असल्याने कोकाटेंच्या समोर मोठे आव्हान असणार आहे.
सिन्नर तालुक्याच्या राजकारणात राजकीय पक्षांना दुय्यम स्थान असल्याने मंत्री कोकाटे आणि खासदार वाजे म्हणतील तो पक्ष असे येथे धोरण आहे. या दोन्ही नेत्यांनी स्थानिक पातळीवर आपल्या नेत्यांना धोरण ठरविण्याचे अधिकार दिले आहेत.
गेल्या आठवड्याभरात राजकीय घडामोडी वेगवान झाल्या असून काही नेते भाजप प्रवेश करणार आहेत. मात्र त्याचा लाभ होण्याऐवजी पक्षाला तोटा अधिक होईल अशी स्थिती आहे. विशेषता महायुतीचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्याशी भाजप प्रवेश केलेल्या नेत्यांचे वैर सर्वश्रुत आहे. त्यामुळे मंत्री कोकाटे भाजपला जवळ करण्याची शक्यता मावळली आहे.
खासदार राजाभाऊ वाजे यांना गेल्या निवडणुकीत पाच आणि मंत्री कोकाटे यांना सीमांतिनी कोकाटे (सोमठाणे) ही एकमेव जागा होती. सध्याच्या राजकीय घडामोडी विचारात घेता खासदार वाजे हे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या चिन्हावर निवडणुका करणार आहे. उदय सांगळे यांच्यामुळे भाजपला सर्व सहा ठिकाणी उमेदवार द्यावे लागतील. मंत्री कोकाटे हे देखील आपले उमेदवार देतील. या स्थितीत उर्वरित सर्व पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते विभागणीत खासदार वाजे यांच्याबरोबर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी निवडणूक अधिक चुरशीची होईल.
1. सिन्नरमध्ये कोकाटे बंधूंचा भाजप प्रवेश का चर्चेत आहे?
कोकाटे हे सिन्नरमधील प्रभावशाली नेते असून त्यांच्या बंधूंच्या प्रवेशामुळे स्थानिक समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
2. उदय सांगळे कोण आहेत?
ते सिन्नरमधील विरोधी नेते असून पुढील आठवड्यात भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.
3. महायुतीत फुट पडण्याची शक्यता का निर्माण झाली आहे?
कोकाटे गट आणि अन्य स्थानिक नेत्यांमधील अंतर्गत मतभेदांमुळे महायुतीत तणाव वाढला आहे.
4. सिन्नरचे सध्याचे राजकीय समीकरण कसे आहे?
सिन्नरमध्ये राजाभाऊ वाजे आणि कोकाटे यांचा प्रभाव असून "ते म्हणतील तोच पक्ष" अशी परिस्थिती आहे.
5. भाजपला याचा काय फायदा होऊ शकतो?
भाजपला सिन्नरमध्ये स्थानिक पातळीवर बळकटी मिळू शकते आणि आगामी निवडणुकांसाठी संघटन मजबूत होईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.