NDCC Bank Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Co-Operative : जिल्हा बँकेत ५ टक्के कमिशन घेणारे दलाल!

Sampat Devgire

नाशिक : जिल्हा (Nashik) मध्यवर्ती सहकारी बॅंकेवर (NDCC Bank) रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादले आहेत. त्यामुळे विविध संस्था (Co-operative) व नागरिकांच्या ठेवी अडकल्या आहेत. या ठेवी (Deposits) परत दिल्याजात नाहीत. मात्र बँकेत कार्यरत दलालांची (Agents) यंत्रणा ५ टक्के कमिशन घेऊन ठेवी मिळवून देतात, असा आरोप नागिरकांनी केला आहे. (NDCC Bank shall investigate a deposits issues to the customers)

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी प्रशासक अरूण कदम यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत विविध संस्थांच्या प्रतिनिधी आणि ठेवीदारांनी बँकेच्या कामकाजाबाबत तक्रारी केल्या. त्यामुळे ही सभा चांगलीच गाजली.

जिल्ह्यातील अनेक संस्थांच्या ठेवी या बँकेत अडकल्या आहे. त्या परत मिळत नसल्याने पतसंस्था अडचणीत आल्याने उपस्थित सोसायटी अध्यक्ष, पतसंस्था अध्यक्षांनी ठेवी परत केव्हा करणार असा प्रश्‍न करत ठेवी परत देण्याची मागणी केली.

ठेवीवरील व्याज देखील देण्याची मागणी केली. यावर प्रशासकांनी बँकेची आर्थिक परिस्थिती पाहता डिसेंबरअखेर ठेवीवरील व्याज हे वसुलीनंतर देण्याचा स्पष्ट केले. ज्या संस्थांना ठेवीतील साधा एक रुपयाही मिळाला नाही त्यांनी बँकेत काही दलाल यांनी ५ टक्के कमिशन घेवून ठेवी व व्याज अदा केल्याचा आरोपही यावेळी केला. आता बँकेवर प्रशासक आहे यापुढे असा प्रकार होणार नाही असे आश्‍वासन श्री. कदम यांनी दिले.

त्यांची नावे जाहीर करा

नोटबंदीपूर्वी बँकेची आर्थिक परिस्थिती अतिशय चांगली होती. मात्र नोटबंदीनंतर बँकेची आर्थिक पत ढासळली. यावेळी अनेकांनी रात्रीतून बँकेतून नोटा बदली करुन घेतल्यानेच बँकेची अशी अवस्था झाल्याचा आरोप सदस्य सुरेश बोराडे यांनी करत त्या सर्वाची नावे बँकेने जाहीर करण्याची मागणी केली. जर असे झाले नाही तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करणार असल्याचेही स्पष्ट केले.

येवला मर्चंट, जनलक्ष्मी येणार अडचणीत

विश्‍वास ठाकूर यांनी ४४ सहकारी बँकांचे जिल्हा बँकेत ११० कोटी अडकले आहे. यामुळे ठेवीदारांना पैसे देत येत नाही. जर ठेवीचे पैसे मिळाले नाही तर या बँका अडचणीत येतील. त्यामुळे जिल्हा बँकेने या दोन्ही बँकांचा प्रामुख्याने विचार करुन त्यांना ठेवी देण्याची मागणी केली.

सभेतील मुख्य मुद्दे व ठराव

- जिल्हा बँकेचे आता तरी राज्यबँकेत विलनीकरण नाही

- विलनीकरणापूर्वी सदस्यांचे मत विचारात घेण्याचा ठराव

- ठेवीचे नूतनीकरण न करता त्याचे किमान ५० टक्के पैसे द्यावे

- बँकेतील कर्मचाऱ्‍यांच्या निवृत्तीचे वय ५८ वरुन ६० वर्षे करण्याचा ठराव

- ८४३ कर्मचाऱ्यांना होणार लाभ

- नासाका आणि निसाका कारखाने बंद पडल्यानेच बँक आर्थिक अडचणीत

- वैयक्तिक कर्जदाराकडून ५ टक्क्यांऐवजी आता १० टक्के शेअर्स कपात करुन

- सोसायटी यांच्याकडून ५००० रुपये ऐवजी २५ हजार रुपये शेअर्स कपात

---------

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT