Farmers Politics; गेले काही वर्ष नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आर्थिक संकटात सापडली आहे. विशेषता नोटबंदीनंतर या बँकेवर मोठे संकट कोसळले. त्याला सध्या सत्तेत असलेले पक्ष आणि नेते जबाबदार आहेत.
नाशिक जिल्ह्यात १५ पैकी १४ आमदार सत्ताधारी महायुतीचे आहेत. याच आमदारांच्या जीवावर सरकार सुरू आहे. त्यातही तीन मंत्री आहेत. मात्र या सर्व सत्तेचा जिल्हा बँकेला काहीही उपयोग नाही अशी स्थिती आहे.
आता तुम्ही सध्या जिल्हा बँक थकबाकीमुळे आर्थिक संकटात सापडले आहे. या बँकेचा एनपीए १०२४ कोटींवर गेला आहे. त्यामुळे सध्या केवळ कर्मचाऱ्यांचा पगार आणि प्रशासकीय खर्च काढण्यासाठीच सुरू आहे की काय, अशी स्थिती आहे. त्याचा शेती आणि शेतकरी दोन्हींवर गंभीर व नकारात्मक परिणाम होत आहे.
या बँकेला संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रशासकांचे नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मोठी अपेक्षा होती. मात्र ही अपेक्षा देखील फोल ठरली आहे. किंबहुना अजित पवार यांनी बँकेच्या हिताकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले, अशी राजकीय स्थिती आहे.
बँकेने यापूर्वी वसुलीसाठी थकबाकीदार शेतकऱ्यांच्या जमिनींचे लिलाव करण्याचा प्रयोग केला तो प्रयोग फारसा यशस्वी झाला नाही त्यामुळे आता पुन्हा एकदा वसुलीवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे त्यासाठी एक रकमी सेटलमेंट करण्याचा प्रस्ताव आहे. हा थकबाकी वसुलीसाठी अल्टिमेटमच मानला जातो हा प्रयोगही यशस्वी झाल्यास बँकेपुढे अस्तित्व टिकविणे कठीण होणार आहे.
राज्यातील काही बँकांना शासनाकडून अर्थसहाय्य करण्यात आले आहे. जिल्हा बँकेने मात्र तीन वर्षांपासून पाठपुरावा करूनही त्याला प्रतिसाद मिळालेले नाही. तत्कालीन पालकमंत्री दादा भुसे यांनी याबाबत जाहीर आश्वासन दिले होते. प्रत्यक्ष कृतीत मात्र ते उतरले नाही. सध्या तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे जिल्हा बँकेची संबंधितच आहेत. नरहरी झिरवाळ आणि दादा भुसे हे देखील मंत्री आहेत.
तीन मंत्री असूनही जिल्हा बँकेच्या प्रश्नाकडे मात्र कोणीही फारसे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे सध्या गाव मामाचा आणि एक नाही कामाचा आशिष स्थिती सहकारी क्षेत्रातील या बँकेवर आली आहे. राजकीय नेते आणि संस्थांकडे पाच लाखांपेक्षा अधिक थकबाकी असले यांची संख्या 63 टक्के आहे. त्यामुळे राजकीय नेते पुढे आले तर या बँकेला संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळू शकतो. जिल्ह्यातील आमदार आणि मंत्री त्या दृष्टीने काय करतात, याचीच आता उत्सुकता आहे.
----
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.