Kirit Somaiya Politics: किरीट सोमय्यांचा बांगलादेशी नागरिकांचा मुद्दा, किती गांभिर्याने घेतला जातोय?

Kirit Somaiya; Congress and NCP came forward against Somaiya on Banglades citizen issue-विशेष पोलीस पथकाचे दत्तात्रय कराळे यांना सोमय्या यांच्या आरोपात आढळेंना तथ्य?
Kirit Somaiya
Kirit SomaiyaSarkarnama
Published on
Updated on

Kirit Somaiya News: विरोधी पक्ष आणि भाजपला अपेक्षित असलेल्या नेत्यांवर आरोप करून त्यांना नामोहरम करणे यासाठी किरीट सोमय्या प्रसिद्ध आहेत. मात्र सध्या त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही की काय, अशी स्थिती आहे. त्यामुळे त्यांचा राजकीय प्रभाव घातला तर नाही ना? अशी चर्चा आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नुकतेच मालेगाव आणि छत्रपती संभाजी नगरसह सिल्लोड शहराचा काही भागांचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी या भागातून मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी नागरिकांना जन्म दाखले दिल्याचा आरोप केला आहे. त्यांनी सांगितलेली संख्या हजारात आहे.

Kirit Somaiya
Raj Thackrey Politics: राज ठाकरेंकडे नाशिक महापालिकेसाठी कोणता मंत्र?

विशेष म्हणजे सोमय्या यांनी निवड केलेले शहर आणि तेथील लोकप्रतिनिधी दोघेही अल्पसंख्यांक समाजाचे आहेत. हे लोकप्रतिनिधी भाजपच्या टार्गेटवर आहेत. त्यामुळे या आरोपांना सणसणाटी स्वरूप देण्याचा सातत्याने प्रयत्न होत आहे.

Kirit Somaiya
Mahakumbh Mela: महाकुंभ मेळ्यात आज कोणता जागतिक विक्रम?, यामुळे होत आहे जगभर चर्चा!

विशेष म्हणजे सोमय्या यांनी निवड केलेले शहर आणि तेथील लोकप्रतिनिधी दोघेही अल्पसंख्यांक समाजाचे आहेत. हे लोकप्रतिनिधी भाजपच्या टार्गेटवर आहेत. त्यामुळे या आरोपांना सणसणाटी स्वरूप देण्याचा सातत्याने प्रयत्न होत आहे.

भाजप नेते सोमय्या यांनी तीन वेळा मालेगाव शहराचा दौरा केला. यावेळी त्यांनी मोठ्या प्रमाणावर हवाला रॅकेटचा पैसा येथे वापरला जात असल्याचा दावा केला. महापालिका आणि महसूल विभागाने शेकडो बांगलादेशी जन्मदाखले आणि मतदार यादीत नोंदणी केल्याचा दावा त्यांनी केला आहे. या संदर्भात शासनाने नियुक्त केलेल्या एसआयटीने देखील तपास सुरू केला आहे.

एसआयटी चे प्रमुख विशेष पोलीस महासंचालक दत्तात्रय कराळे यांनी नुकतीच मालेगाव शहरात या संदर्भात तपासणी केली. त्यासाठी त्यांनी एक विशेष कक्ष स्थापन केला आहे. मात्र त्यांच्या तपासणीत अद्याप पर्यंत एकही बांगलादेशी नागरिक किंवा त्यांना जन्मदाखला देण्यात आल्याचे आढळलेले नाही. त्यामुळे सोमय यांचे आरोप आणि प्रत्यक्ष तपासणी यामध्ये निर्माण झालेला फरक राजकीय वादाचा विषय बनला आहे.

आता भाजप नेते सोमय्या यांच्या विरोधात एकमेकांचे तोंडही न पाहणारे मालेगावचे नेते एकत्र आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे माजी आमदार आणि सध्या कोणत्याच पक्षात नसलेले असिफ शेख आणि समाजवादी पक्षाचे माजी नगरसेवक मुस्तकीम डिग्निटी यांनी सोमय्या यांना आव्हान दिले आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष आसिफ बेग यांनी यापूर्वीच सोमय्या यांचे आरोप फेटाळले आहेत.

त्यामुळे आता सोमय्या यांना त्यांच्याच भाषेत मालेगावच्या राजकीय नेत्यांनी उत्तर देण्याची तयारी सुरू केली आहे. एकंदरच भारतीय जनता पक्षाचा आगामी राजकीय अजेंडा बांगलादेशी नागरिक असल्याचे जाणवू लागले आहे. या संदर्भात गृह विभाग बांगलादेशी आणि अनधिकृत नागरिकांवर कारवाई करून आपली जबाबदारी पार पाडतो की, पुन्हा एकदा राजकीय आरोप प्रत्यारोपंना संधी उपलब्ध करून देतो याची उत्सुकता आहे.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com