NEET Paper Leak Case : NEET पेपर फुटीचे नाशिक कनेक्शन समोर आल्यानंतर आता या प्रकरणात पेपर फोडणारा संशयित शुभम खैरनार याच्या नाशिकमधील सुचितानगर परिसरातील फ्लॅटवर मुंबई नाका पोलिसांनी धाड टाकत झडती घेतली. परंतु या कारवाईत पोलिसांच्या हाती कोणतेही संशयास्पद साहित्य लागले नाही. मात्र, त्याच्या भावासंदर्भात धक्कादायक माहिती पोलिसांना कळाली आहे.
पोलिसांनी प्लॅटवर धाड टाकली त्यावेळी फ्लॅटमध्ये शुभमचा भाऊ आणि आणखी दोन ते तीन जण राहत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी सर्वांची चौकशी केली असता चौकशीत शुभमच्या भावाविरोधात यापूर्वी अवैधरित्या गावठी कट्टा बाळगल्याचा गुन्हा दाखल असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मात्र, पोलिसांना फ्लॅटमधून कोणतेही आक्षेपार्ह साहित्य मिळाले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
देशातील २२ लाख विद्यार्थ्यांनी ३ मे रोजी NEET चा पेपर दिला होता. परंतु नीट परीक्षेचा पेपर परीक्षेच्या एक दिवस आधीच फुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने ही परीक्षाच आता रद्द करण्यात आली आहे. २२ लाख विद्यार्थ्यांना आता पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे.
तपासात मुळचा नाशिकचा असलेला शुभम खैरनार याने अज्ञात व्यक्तीकडून तब्बल १० लाख रुपयांना पेपर खरेदी केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानंतर त्याने तोच पेपर दिल्ली व हरियाणातील व्यक्तींना १५ लाख रुपयांना विकल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.
राजस्थानमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर राजस्थान पोलिसांच्या विनंतीवरुन नाशिक पोलिसांनी शुभम खैरनारला अटक करुन त्याला सीबीआयच्या ताब्यात दिले होते. नाशिक पोलिसांनी अतिशय शिताफीने व प्लॅनींग करुन त्याला अटक केली. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी शुभमने आपली हेअरस्टाईल तसेच पेहराव बदलवला होता. परंतु नाशिक पोलिसांच्या तीक्ष्ण नजरेतून तो सुटला नाही.
नाशिकच्या शुभम खैरनार याने अहमदनगरच्या धनंजय लोखंडे याच्याकडून १० लाख रुपयांना प्रश्नपत्रिका खरेदी करून ती हरियाणातील गुरुग्राम येथील संशयिताला टेलिग्रामद्वारे १५ लाख रुपयांत विकल्याचे आतापर्यंतच्या तपासातून समोर आले आहे. धनंजयने पुण्यातून कुरिअरमार्फत प्रश्नपत्रिका शुभमपर्यंत पोहोचविल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर शुभमने टेलिग्रामच्या माध्यमातून ती प्रश्नपत्रिका गुरुग्राम येथील संशयिताला १५ लाख रुपयांत विकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.