Adv. Sanjay Sukhdan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Newasa firing case : मुख्याधिकाऱ्यावर गोळीबार! केजरीवालांच्या नेत्यावर गुन्हा; राजकारणात खळबळ, दिल्लीपासून गल्लीपर्यंत चर्चा

Chief Officer Nikhil Farate files police complaint after alleged firing incident involving AAP corporator Shalini Sukhdan husband, Adv. Sanjay Sukhdan : नेवासा नगरपंचायतीमधील आम आदमी पक्षाच्या उपनगराध्यक्ष शालिनी सुखधान यांचे पती अ‍ॅड. संजय सुखधान यांच्याविरोधात मुख्याधिकारी यांनी गोळीबार केल्याची तक्रार दिल्याने खळबळ उडाली आहे.

Pradeep Pendhare

Nagar Panchayat firing Maharashtra : नेवासे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी निखिल फराटे यांनी अहिल्यानगर इथल्या तोफखाना पोलिस ठाण्यात आम आदमी पक्षाच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील एकमेव नगरसेविका तथा उपनगराध्यक्षा शालिनी सुखधान यांचे पती अ‍ॅड. संजय सुखधान यांच्या विरोधात शिवीगाळ, धमकी व गावठी पिस्तुलातून गोळीबार केल्याची फिर्याद दिल्याने खळबळ उडाली.

नेवासा नगरपंचायत व सत्ताधारी पक्षावर भ्रष्टाचाराचा मुद्दा ऐरणीवर असताना यातून सावरण्यासाठी दाखल केलेली फिर्याद खोटी असल्याचे सांगत आज शहरात बंद पाळून मोर्चाने निवेदन देण्यात येणार आहे. प्रशासन विरोधात आप, क्रांतिकारी शेतकरी पक्ष आणि अन्य पक्षाचे कार्यकर्ते एकवटले आहेत.

मुख्याधिकारी निखिल फराटे यांनी दिलेल्या फिर्यादीत सोमवारी सायंकाळी कार्यालयातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कामानिमित्त जाताना नेवासे इथल्या खोलेश्‍वर मंदिरापासून जवळ माझ्या वाहनास आपचे (AAP) संजय सुखदान यांनी बुलेट वाहनाची धडक दिली. पुढे जाताना दुचाकी आडवी लावून गावठी पिस्तुलातून माझ्या दिशेने गोळीबार केला. खाली वाकल्याने गोळी चुकली, तरी जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद केले.

मागील आठवड्यात घटना होऊन तक्रार दिली नव्हती; मात्र त्याचे साथीदार माझ्या वाहनाचा पाठलाग करत असल्याने भीतीपोटी तक्रार देत असल्याचे निखिल फराटे यांनी फिर्यादीत (Crime) नमूद केले. संजय सुखधान यांनी शासकीय कर्तव्य करीत असताना शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा उल्लेख आहे.

दाखल करण्यात आलेली फिर्याद खोटी असल्याचा आरोप करून संजय सुखधान, क्रांतिकारीचे नगरसेवक व अन्य पक्षातील कार्यकर्त्यांनी व काही व्यापाऱ्यांनी बंदची हाक दिली. आज सकाळी दहा वाजता पंचायत समितीच्या प्रवेशद्वार समोर अंदोलन, मोर्चा व प्रशासनास निवेदन देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.

अ‍ॅड. संजय सुखधान यांच्या पत्नी शालिनी यांचा नगरसेवकपदी विजय झाल्यानंतर, अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने महाराष्ट्रात पहिलं विजयाचं खातं अहिल्यानगरमधील नेवासा नगरपंचायतीत उघडलं. दिल्लीचे नेते तथा महाराष्ट्राचे पक्षाचे प्रभारी प्रकाश जरवाल यांनी विजयाची दखल घेतली. आता नगरसेविका तथा उपनगराध्यक्षा शालिनी सुखधान यांच्या पत्नी अ‍ॅड. संजय सुखधान यांचा प्रशासनाबरोबर संघर्ष उफळला आहे. यात कोण जिंकतो, याकडे आता लक्ष लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT