Sharad Argade Sarpanch Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sarpanch Superstition Awareness : अजब गावकथा: जिवंत सरपंचाचा दहावा; कावळा शिवला पिंडाला, प्रबोधनातून अंधश्रद्धेचा भांडाफोड

Soundala village sarpanch performs his own “dasva” ritual while alive to send a strong message against blind faith and superstitious practices : जातमुक्तीचा ठरावानंतर नेवासा इथल्या सौंदाळा गावाच्या सरपंचाने स्वतःचा जिवंतपणी दहावा घालून प्रबोधनात्मक संदेश दिल्याचे कौतुक होत आहे.

Pradeep Pendhare

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सौंदाळा गाव पुन्हा एकदा राज्यात प्रबोधनात्मक उपक्रमामुळे चर्चेत आले आहे. जातीमुक्त गावाचा ठराव करत, आता सरपंच शरद आरगडे यांनी स्वतः जिवंतपणी दहावा घालत प्रबोधनात्मक उपक्रम केला.

सत्यशोधकपद्धतीने दशक्रिया विधी घालून, पिंडदान केलं. पिंडाला कावळा देखील शिवला. हा सर्व प्रबोधनात्मक उपक्रम होता, यातून अंधश्रद्धेला तिलांजली देण्यासाठी उचलेलं पाऊल होतं, असं सरपंच शरद आरगडे यांनी म्हटलं.

हिंदू (Hindu) धर्मात व्यक्तीच्या निधनानंतर दहाव्या दिवशी पिंडदान अन् उत्तरकार्य करण्याची प्रथा केली जाते. मृत्यूनंतर अस्थी विसर्जन, दशक्रिया, तेरावा विधीसाठी, या सर्व धार्मिक विधीवर अवाजवी खर्च होतो. माणूस जिवंत असताना मात्र, त्याच्या गरजांकडे बहुतांशी वेळा दुर्लक्ष केले जाते. पण त्याच्या मृत्यूनंतर, समाजाने नाव ठेवू नये, यासाठी बहुतांशी जण मोठा खर्च करतात.

मृत्यूनंतर आत्मा शांत होतो किंवा ठराविक विधी केल्यानंतरच त्याला मोक्ष मिळतो, अशी समजूत समाजामध्ये आहे. लोकांमधील असे गैरसमज दूर करण्यासाठी आपण जिवंतपणीच स्वतःचे पिंडदान करत केल्याचे सरपंच (Sarpanch) आरगडे यांनी सांगितले.

माझ्या निधनानंतर माझ्या पत्नीने कोणत्याही विधवा प्रथा पाळू नयेत. तिने कुंकू पुसू नये. बांगड्या फोडू नयेत किंवा मंगळसूत्र उतरवू नये, असे स्पष्ट नमूद करणारे कायदेशीर प्रतिज्ञापत्र सरपंच आरगडे यांनी तयार केले आहे.

पत्नीला रुढींमध्ये अडकवू नये

माझ्या मृत्यूनंतर कोणतेही सुतक पाळले जाऊ नये किंवा धार्मिक कर्मकांड करू नये. पतीच्या निधनानंतर पत्नीला सन्मानाने जगण्याचा पूर्ण अधिकार असून, समाजातील जाचक रुढींमध्ये तिला अडकवू नये, असेही त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

सत्यशोधक पद्धतीतून प्रबोधन

गावात जातमुक्तीचा ठराव करून सामाजिक समतेसाठी काम करणारे, नेवासा तालुक्यातील सौंदाळा गावचे सरपंच शरद आरगडे यांनी जिवंतपणीच स्वतःचा दशक्रिया विधी घालून पिंडदान करत सामाजिक रुढी, अंधश्रद्धेला तिलांजली दिली. आरगडे यांची पत्नी प्रियंका आणि मुलगा संग्राम यांनी भेंडा इथल्या स्मशानभूमीत सत्यशोधक पद्धतीने पिंडदान विधी पार पाडला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT