Rupali Chakankar Controversy : शिक्षिकेवर हल्ला, शेकडो युवक भोंदूगिरीच्या विळख्यात; रूपाली चाकणकरांचा 'बुवा-बाबा संरक्षण आयोग' रंजना गवांदेंकडून एक्सपोज!

Complaint over superstition racket leads to assault on woman teacher in Sangamner, Advocate Ranjana Gawande alleges no action by Women Commission chief Rupali Chakankar against Ashok Kharat follower : महिला आयोगाच्या अध्यक्षा असताना रूपाली चाकणकरांकडे तक्रारी करून देखील कारवाई होत नसल्याची, असा दावा 'अंनिस'च्या अ‍ॅड. रंजना गवांदे यांनी केला.
ranjana gawande
ranjana gawandeSarkarnama
Published on
Updated on

Rupali Chakankar news : नाशिक मधील भोंदूबाबा अशोक खरात याच्यामुळे अडचणीत सापडलेल्या, महिला आयोगाचं अध्यक्षपदावरून पायउतार व्हावा लागलेल्या, रूपाली चाकणकर अध्यक्षपदावर असतानाची, कार्यपद्धतीचे कारनामा आता समोर येऊ लागले आहे.

अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या राज्य सचिव अ‍ॅड. रंजना गवांदे यांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे. अ‍ॅड. गवांदे यांच्या दाव्यानुसा चाकणकर यांच्या अडचणी अधिक वाढण्याची शक्यता आहे.

अंनिसच्या अ‍ॅड. रंजना गवांदे यांनी 'सरकारनामा'शी बोलताना, रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) महिला आयोगाच्या अध्यक्षा असताना, त्यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींसाठी पाठपुरावा देखील केला होता. पण त्यावर कोणतीच कारवाई झाली नसल्याचा दावा केला आहे.

संगमनेर (Sangamner) तालुक्यातील घुलेवाडी इथं एका शाळेत महिला शिक्षिकेला शिक्षकाने मुलांसमोर मारलं होतं. यासंदर्भातील महिला आयोगाकडे आपण स्वतः तक्रार केली होती. त्यांनी सुरवातीला दखल घेतली नाही, म्हणून दुसऱ्यांदा पुन्हा रिमाइंडर पाठवले. तरीही महिला आयोगानं दखल घेतली नाही, असा दावा अ‍ॅड. गवांदे यांनी केला आहे.

ranjana gawande
Popatrao Pawar controversy : अशोक खरातमुळे पेच वाढला; पद्मश्री पोपटराव पवारांचा ठाम इशारा, “अख्खं गाव माझ्या..!”

मात्र दुसरीकडे एका पत्रकार अशोक खरात प्रकरणाची, लावलेली मोघम बातमीची तत्काळ दखल घेतली. त्याला धमकावलं, त्याविरोधात कायदेशीर कारवाई केली. माफीनामा लिहून घेतला. यावरून याला महिला आयोग म्हणायचं की, 'बुवा-बाबा संरक्षण आयोग' म्हणायचं, असा सवाल अ‍ॅड. गवांदे यांनी केला.

ranjana gawande
Rupali Chakankar Pressure Allegations : 'बिंग' फुटणार? अशोक खरात सावध; चाकणकरांचा पोलिसांवर थयथयाट? सर्व काही आलं समोर...

पुण्यासह राज्यातील भोंदूगिरीवर वेधलं होतं लक्ष

तसंच, पुण्यात एमबीए झालेला युवक बुवाबाजी करत होता. एक अ‍ॅप डाऊनलोड करून, त्यातून त्याची बुवाबाजीचा प्रचार-प्रसार सुरू होता. यात त्याने शेकडो युवकांना नादी लावलं होतं. यानंतर दुसऱ्या एका प्रकारात पुण्यातील एका आयटी इंजिनिअरला 14 कोटी रुपयांना फसवलं गेलं होतं. या दोन्ही प्रकरणावर रूपाली चाकणकर यांना फोन केला होता. अशी प्रकरण गंभीर असून, संपूर्ण महाराष्ट्रात कमी-अधिक प्रमाणात, असे उद्योग सुरू आहेत, याकडे लक्ष वेधल्याचे अ‍ॅड. गवांदे यांनी सांगितलं.

प्रबोधनाची मागणी अन् चाकणकरांचं तुटक उत्तर...

महाराष्ट्रातील वाढत्या भोंदूगिरीला रोखण्यासाठी, जादूटोणा विरोधी कायद्याच्या प्रचार-प्रसारासाठी कार्यशाळा घेण्याचं रूपाली चाकणकर यांना सुचवलं. यासाठी कोणत्याही अर्थिक मदतीची अपेक्षा न करता, कोणताही चहा-पाणी नको, असे सांगून, फक्त महिला आयोगाची माणसं, कार्यक्रमात तिथं असावीत, अशी मागणी नोंदवली होती. यावर रुपाली चाकणकर यांनी, 'आम्ही त्यावर काम करणार आहोत,' असं तुटक उत्तर दिलं, असा दावा अ‍ॅड. गवांदे यांनी केला.

अंधश्रद्धेला बळ, चाकणकरांवर कारवाई हवीच

रूपाली चाकणकर यांचं संविधानिक पदावर बसून असं वागण्यावरून अ‍ॅड. रंजना गवांदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करताना, महिला आयोग म्हणून तुमचं असं वागणं म्हणजे, जिथं नको तिथं नाक खुपसायचं, जी काम करायची ती करायचीच नाही, नुसतं मिरवत फिरणं हे खूप चुकीचं होतं. संविधानिक पदावर असताना, अशा भोंदूगिरी करणाऱ्या, अवैज्ञानिक गोष्टींच्या मागे लागणाऱ्या, त्याच्या शोषणाच्या बाबी माहिती नसल्या तरी, त्याच्या अंधश्रद्धाचे प्रकार माहिती होते. मग महिला आयोगाच्या प्रमुख म्हणून तुम्ही संविधानिक पदावर असून देखील का कारवाई केली नाही, असा घणाघात अ‍ॅड. रंजना गवांदे यांनी केला.

चाकणकरांच्या बचावाच्या पवित्र्यावर टीका

उलट तुम्ही संरक्षणाचं छत्र धरलं, यातून रूपाली चाकणकर यांनी विराजमान असलेल्या संविधानिक पदाची उंची कमी करणारं कृत्य केलं. रूपाची चाकणकर यांनी, स्त्री म्हणून टार्गेट करत आहेत, असा बचावाचा पवित्रा घेतला. यावर अ‍ॅड. रंजना गंवादे यांनी सडकून टीका केली. हा बचावाचा त्यांचा पवित्रा खूप चुकीचा आहे. तुम्ही केवळ स्त्री नाहीतर, महिला आयोगाच्या अध्यक्ष होतात. ती जबाबदारी पार पाडली नाही, याकडे अ‍ॅड. गवांदे यांनी लक्ष वेधलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com