Nilesh Lanke Balasaheb Thorat Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nilesh Lanke Balasaheb Thorat Statement : विखेंना शह की थोरातांशी जवळीक? नीलेश लंकेंनी सांगितला अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीचा 'तिसरा पर्याय'; म्हणाले, 'बाळासाहेब माझे नेते!'

Nilesh Lanke calls Balasaheb Thorat his leader and hints at a possible third option with Ram Shinde in Ahilyanagar District Bank politics : अहिल्यानगर जिल्हा बँकेतील विजयानंतर लंकेंचे मोठे विधान; गरज पडल्यास थोरात आणि राम शिंदेंसोबत जाण्याची तयारी, साखर कारखानदारांच्या 2850 कोटींच्या कर्जवाटपावरही घातला हात.

Pradeep Pendhare

Ahilyanagar District Bank Election : अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेतील विजयानंतर विखे पाटील-थोरात सहमती एक्स्प्रेसमध्ये असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याविषयी मोठे विधान केले आहे.

बाळासाहेब हे माझे नेते आहेत. ते आजही आणि उद्याही राहतील, असे सांगताना पदाधिकारी निवडीत आवश्यकता भासल्यास आपण थोरात व राम शिंदे यांच्यासोबत जाऊ, असे खासदार लंके यांनी सांगत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीत तिसरा पर्याय आहे, असे सूचक संकेत दिले.

जिल्हा बँकेच्या (DCC Bank) निवडणुकीच्या सुरूवातीपासून थोरात आणि लंके आमने-सामने आले नव्हते. अहिल्यानगर शहराच्या शासकीय विश्रामगृहावर अर्ज माघारी घेण्याच्या एक दिवस अगोदर झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत थोरातांसमोर खासदार लंके आले होते. त्यावेळी सभापती प्रा. राम शिंदे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सुजय विखे पाटील, शंकरराव गडाख यांच्यासह सर्वच नेते हजर होते.

या बैठकीत देखील थोरात-लंके यांच्या फारशी चर्चा झाली नाही. संगमनेर येथे अमृतकुटीवर झालेल्या पहिल्या बैठकीला खासदार लंके (Nilesh Lanke) आणि राम शिंदे अनुपस्थित होते. यानंतर थोरात-सुजय विखे पाटील यांच्या दोन ते तीन बैठका झाल्या. राम शिंदे-लंके यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्या. बैठका झाल्या. पण थोरात-लंके यांच्यात थेट अशी बैठक झाली नाही. त्यामुळे थोरात अन् लंके यांच्यात सुरूवातीपासून काहीसे अंतरच दिसले. तुलनेत थोरात-सुजय विखे पाटील यांच्यात राजकीय अंतर कमी झाल्याचे दिसले.

खासदार लंकेंच्या विजयावर थोरातांच्या अगोदर माजी खासदार सुजय विखे पाटलांची प्रतिक्रिया आली आहे. जिल्हा बँकेत राम शिंदे, नीलेश लंके यांचेही सहाकार्य घेऊ, खासदारांना विजयाच्या शुभेच्छा, असे विखे पाटील यांनी म्हटले आहे. खासदार लंकेंविरोधात माझा मित्र राहुल शिंदे मैदानात होता. ग्रामपंचायतीचा साधा सदस्य नसलेल्या विरोधात खासदारांचा विजय झाला आहे. त्याच्या पराभवाचे दुःख असून, ती जबाबदारी मी घेतो, असेही विखे पाटील यांनी म्हटले आहे.

कारखानदारांना 200-400 कोटी हातउसने...

दरम्यान, खासदार लंके यांनी विजयानंतर जिल्हा बँक ठराविक लोकांचा अड्डा झाली आहे. 2850 कोटींचे अनियमित वाटप साखर कारखानदारांना झाले आहे. त्याची वसुली झाल्याशिवाय आपण शांत बसणार नाही. काही कारखानदारांना 200-400 कोटी हातउसने दिले आहेत. ही वसुली होईल. आरबीआयच्या नियमाप्रमाणे कर्जवाटप व त्याची वसुली होईल. हाउसने पैसे घेतले आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल करू, असे आव्हान खासदार नीलेश लंके यांनी दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT