Nilesh Lanke vs Radhakrishna Vikhe Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nilesh Lanke vs Radhakrishna Vikhe : '...तर आम्हीही गुंडगिरी दाखवू'; भाजप मंत्री विखेंनी खासदार लंकेंना ललकारलं

Maharashtra politics MP Nilesh Lanke Parner Supa MIDC BJP Minister Radhakrishna Vikhe Patil : खासदार नीलेश लंके यांनी पारनेर सुपा एमआयडीसीमधील गुंडगिरीवरून केलेल्या टीकेला भाजप मंत्री राधाकृष्ण विखे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

Pradeep Pendhare

Maharashtra politics latest news : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके यांनी पारनेरच्या सुपा एमआयडीसी भाजप मंत्री राधाकृष्ण विखे आणि त्यांचे पुत्र माजी खासदार सुजय विखे यांच्या गुंडगिरीवरून निशाणा साधला होता.

खासदार लंकेंच्या या आरोपावरून मंत्री विखे यांनी देखील दम भरत ललकारलं आहे. 'आमच्यावर गुंडगिरीचा आरोप करत असेल, तर आम्हीही गुंडगिरी काय असते ते दाखवू. आम्ही दोन हात करायला तयार आहोत', असे आव्हान मंत्री विखेंनी दिले आहे.

पारनेर तालुक्यातील सुपा 'एमआयडीसी'त भाजप (BJP) मंत्री राधाकृष्ण विखे आणि त्यांचे पुत्र माजी सुजय विखे यांच्याकडून प्रशासनाच्या माध्यमातून उद्योजकांना त्रास देण्याचे काम सुरू आहे. अनेक उद्योजकांच्या तक्रारी आहे. प्रशासकीय अधिकारी कोणत्या ना कोणत्या कारणावरून उद्योजकांना त्रास देत आहेत, या मागे विखे पिता-पुत्र असल्याची शंका घेऊन, खासदार नीलेश लंकेंनी गंभीर आरोप केले होते.

'आम्ही गुंडगिरी करत नाही. परंतु तुमचे तसे म्हणणे असेल, तर तुमच्याशी गुंडगिरी करण्याची आमची तयारी आहे. तुम्ही सांगा आम्ही दोन हात करू. तुम्ही वेळ सांगा, असे आव्हान देत सुपा-पारनेर औद्योगिक वसाहतीमधील वातावरण आपण असुरक्षित होऊ देणार नाही', असा इशाराही खासदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी दिला होता.

खासदार लंकेंच्या या आरोपांना मंत्री विखे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. "एमआयडीसीत कोणाची दहशत आहे, हे सांगण्याची गरजच नाही. आमच्यावर गुंडगिरीचा आरोप करणाऱ्यांकडूनच दहशत सुरू आहे. जर आमच्यावर गुंडगिरीचा आरोप करत असेल, तर आम्हीही गुंडगिरी काय असते ते दाखवू. आम्ही दोन हात करायला तयार आहोत", असे म्हणत मंत्री विखेंनी खासदार लंकेंना ललकारलं आहे.

लक्ष देऊ नका

पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी अशा लोकांकडे फार लक्ष देऊ नका. काही लोकांच्या बाबतीत बोलणं ही संयुक्तिक नाही. ते काय बोलले, त्यांनी काय बोलावं, हा त्यांचा प्रश्न आहे. एवढ्या क्षुल्लक कारणासाठी प्रतिक्रिया देणे योग्य नाही, असेही म्हटले.

राऊतांनी चिंता करावी

राज्य सरकार हलाल आणि झटकामध्ये पडले असून शेतकरी एकीकडे आत्महत्या करत आहेत, त्याकडे लक्ष कोण देणार, असे खासदार संजय राऊत यांनी म्हणत टीका केली होती. त्यावर मंत्री विखे यांनी राऊत काय म्हणतात याची आम्हाला चिंता नाही. एवढ्या मोठ्या विधानसभा निवडणुकीत जनतेने त्यांना झटका दिलेला आहे. त्यांनी त्याची चिंता करावी.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT