Manikrao Kokate Politics: कृषिमंत्री कोकाटे यांच्या अडचणी वाढणार? आता उच्च न्यायालयात सुनावणी!

Manikrao kokate; Minister Manikrao Kokate's troubles will not yet end, opposition confident on outcome-कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला जिल्हा सत्र न्यायालयाने स्थगिती दिल्याने त्यांचे मंत्रिपद वाचले होते.
Manikrao Kokate
Manikrao KokateSarkarnama
Published on
Updated on

Manikrao Kokate News: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालhttps://www.youtube.com/watch?v=zgxyuvWhOT4यीन खटल्यात दिलासा मिळाला आहे. मात्र त्यांच्या अडचणी अद्यापही संपलेल्या नाहीत. त्यांच्या विरोधकांनी कोकाटे याच्या विषयीच्या निकालावर गंभीर आक्षेप नोंदविला आहे.

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना शासकीय सदनिका घेताना बनावट कागदपत्र सादर केली होती. याबाबत न्यायालयाने या ३० वर्षे जुन्या प्रकरणात त्यांना दोन वर्षाची शिक्षा ठोठावली होती. त्यामुळे कृषिमंत्री कोकाटे यांचे मंत्रिपद आणि विधिमंडळ सदस्यत्व दोन्हीही अडचणीत आले होते.

Manikrao Kokate
Manikrao Kokate : काँग्रेसच्या 'ऑफर'चा धुरळा बसत नाही, तोच मंत्री कोकाटेंनी फोडला बाॅम्ब; म्हणाले, 'अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत'

कनिष्ठ न्यायालयाच्या या निकाला विरोधात कृषी मंत्री कोकाटे यांच्या वतीने नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयात अपील दाखल करण्यात आले होते. त्यात श्री कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली. ही स्थगिती देताना नोंदविलेले निरीक्षण वादाचा विषय ठरले आहे.

Manikrao Kokate
NCP Sharad Pawar Politics: बोदवडला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला दुहेरी शॉक...७ नगरसेवकांनी पक्ष सोडला!

या निकालावर ॲड कोकाटे यांचे विरोधक अंजली दिघोळे, ॲड शरद शिंदे आणि ॲड झुंजार आव्हाड या तिघांनीही आक्षेप घेतला आहे. या संदर्भात श्रीमती दिघोळे यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात आशुतोष राठोड यांनी याचिका दाखल केली आहे. त्यावर १८ मार्चला सुनावणी होणार आहे, या सुनावणीत महत्त्वाचा आणि धोरणात्मक निर्णय होईल, असा विश्वास श्रीमती दिघोळे यांचे वकील ॲड आशुतोष राठोड यांनी व्यक्त केला आहे.

एकंदरच कृषिमंत्री कोकाटे यांच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे नाहीत. न्यायाधीश नितीन जीवने यांनी निकालाला स्थगिती देताना श्री कोकाटे तीस वर्षे निवडून येत आहेत. निकालाला स्थगिती न दिल्यास मतदारसंघात पुन्हा एकदा निवडणूक घ्यावी लागेल. त्यावर जनतेचा मोठा खर्च होईल, असे निरीक्षण नोंदविले आहे.

याबाबत विरोधी वकील यांनी न्यायाधीशांनी कायद्याच्या बाहेर जाऊन अशी निरीक्षणे नोंदविणे योग्य नाही. त्यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दबाव तर नाही ना? अशी शंका येते. कारण निकाल देणारे न्यायाधीश हे देखील नागपूरचे आहेत. त्यामुळे अनेकांना हा निकाल गोंधळात टाकणार आहे. यासंदर्भात लिली थॉमसन या खटल्यातील निकाल संदर्भ म्हणून घ्यावा असा दावा विरोधकांनी केला आहे. या संदर्भात राज्यपाल देखील स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे कोकाटे यांच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे नाहीत.

--------

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com