Nilesh Lanke On Ajit Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nilesh Lanke On Ajit Pawar : अजितदादांचे ते विधान म्हणजे, 'शिळी कढी'; नीलेश लंके असं का म्हणाले...

Nilesh Lanke Criticized Ajit Pawar : नगर आणि माढा लोकसभा जागेवर दावा होता. परंतु भाजपने जागा सोडली नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार यांनी म्हटले. यावर नीलेश लंके यांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.

Pradeep Pendhare

Nilesh Lanke News : अजित पवार यांचे एकेकाळी लाडके असलेले आमदार आणि आता खासदार झालेले नीलेश लंके यांनी अजितदादांना पहिल्यांदा प्रत्युत्तर दिले. नगर आणि माढा लोकसभेच्या जागेवरून अजितदादांनी भाजपच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. त्यावर नीलेश लंके यांनी आता शिळ्या कढीला उत कशाला? असे म्हटले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी काल नगर आणि माढा जागेबाबत आपण आग्रही होतो. महायुतीकडे तसा आमचा प्रस्ताव देखील होता.

नीलेश लंके महायुतीकडून लढण्यास तयार होते. पण भाजपने त्या जागा सोडल्या नाहीत, असे म्हटले. अजितदादांच्या या विधानावर आता खासदार नीलेश लंके यांनी प्रतिक्रिया दिली. आता शिळ्या कढीला उत कशाला?

आता मी खासदार झालो आहे. धैर्यशील मोहिते पाटील देखील माढ्यातून निवडून आले आहेत. खासदार झाले आहेत. त्यामुळे आता बरच काही होऊन गेलं आहे. त्यामुळे त्यात काही अर्थ नाही, असे नीलेश लंके यांनी म्हटले.

नीलेश लंके यांनी अजितदादांची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षात आला. शरद पवारांचा नेतृत्वाखाली नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून खासदारकी लढवली.

भाजपचे उमेदवार सुजय विखे यांचा त्यांनी पराभव केला. नीलेश लंके यांनी साथ सोडल्याचे शल्य अजितदादांना आहे. लंके यांनी खासदारकी लढवू नये, असा देखील सल्ला अजितदादांनी दिली होता. परंतु नीलेश लंके यांना विखेंकडून त्रास होत असल्याने ते खासदारकीच्या मैदानात उतरले होते.

महायुतीकडून नगरमध्ये आयोजित केलेल्या सभांमध्ये अजितदादा देखील मैदानात उतरले होते. नीलेश लंके यांच्या पारनेर विधानसभा मतदारसंघात अजितदादांनी नीलेश लंके यांच्याविरोधात जोरदार फटकेबाजी केली होती. ही फटकेबाजी अजूनही पारनेरमध्ये चर्चेचा विषय आहे.

अजितदादांनी पारनेरसह कर्जत-जामखेडमध्ये देखील सभा घेतली होती. अजितदादांच्या या दोन्ही सभा चांगल्याच गाजल्या होत्या. अजितदादांनी केलेल्या टिकेवर नीलेश लंके यांनी त्यावेळी चुप्पी साधली होती नेते आहेत.

त्यांच्या मित्रपक्षाच्या उमेदवारासाठी ते प्रचाराला येऊ शकतात, एवढीच प्रतिक्रिया लंके यांनी दिली होती. त्यानंतर आजपर्यंत लंके यांनी अजितदादांविषयी एकही शब्द उच्चारला नव्हता. आता मात्र नगर आणि माढाच्या जागेबाबत अजितदादांनी विधान केल्यावर त्यावर लंके यांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT