Sanjay Raut And Rani Lanke : खासदार राऊतांचे राणी लंकेंबाबत मोठं विधान; शिवसेना ठाकरे पक्षात पारनेरबाबत काय शिजतय?

Sanjay Raut big statement about Parner Assembly Constituency : शिवसेनेचे खासदार संजय राऊत श्रीगोंदा दौऱ्यावर असताना त्यांनी मोठे विधान केले. राणी लंके विधानसभेत कोणत्या भाषेतून शपथ घेणार, अशी विचारणा केली. त्यामुळे पारनेर विधानसभा मतदारसंघाबाबत शिवसेना ठाकरे पक्षाचा डोळा असल्याची चर्चा आहे.
Sanjay Raut And Rani Lanke
Sanjay Raut And Rani LankeSarkarnama
Published on
Updated on

Sanjay Raut News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत श्रीगोंदा तालुक्याच्या दौऱ्यावर असताना झालेल्या सभेत पारनेर आणि श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाबाबत मोठे विधा केले. "नगरमधून सर्वसामान्यांनी नीलेश लंके यांना खासदार केले. त्यांनी लोकसभेत इंग्रजीतून शपथ घेतली. खासदार लंके यांच्या पत्नी राणी लंके तुम्ही विधानसभेत कोणत्या भाषेत शपथ घेणार", असे खासदार राऊत यांनी विचारताच सभास्थळी हशा पिकला.

खासदार राऊत यांच्या विधानानुसार पारनेर विधानसभा मतदारसंघातून राणी लंके विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे संकेत मिळाले. परंतु राणी लंके यांच्यासाठी महाविकास आघाडीत कोणता पक्ष असेल, याची चर्चा सुरू झाली. खासदार राऊत यांचे पारनेर विधानसभेबाबतचे विधान म्हणजे, शिवसेना ठाकरे पक्षात नक्कीच काही तरी शिजत आहे, असे दिसते.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून नीलेश लंके यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपचे (BJP) उमेदवार सुजय विखे यांना कडवी झुंज दिली. यात नीलेश लंके विजयी झाले. लंके यांच्या विजयासाठी महाविकास आघाडी एकसंघपणे कार्यरत होती. नीलेश लंके यांच्या विजयानंतर त्यांच्याकडून महाविकास आघाडीच्या अपेक्षा वाढल्या आहेत. नगर जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एकही आमदार नाही. त्यामुळे शिवसेना ठाकरे पक्षाने या विधानसभेला नगर जिल्ह्यात खाते उघडण्याची तयारी केली.

Sanjay Raut And Rani Lanke
IAS Pooja Khedkar : पूजा खेडकर यांच्याकडे दोन दिव्यांग प्रमाणपत्र; नाॅन क्रिमीलेअरची चौकशी सुरू

खासदार राऊत यांचे नगर जिल्ह्यात यातूनच हर एक कारणाने दौरे वाढलेत. लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) निमित्ताने राऊत यांचे झालेल्या दौऱ्यावर त्यांचा नगर दक्षिण आणि उत्तर लोकसभा मतदारसंघाचा चांगला अभ्यास केलाय. शिवसेना ठाकरे पक्षांकडून इच्छुकांची संख्या जास्त आहे. परंतु विजयी उमेदवार हाच शेवटचा निकष ठेवून महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष चाचपणी करत आहे. यातच खासदार राऊत यांनी राणी लंके यांना विधानसभा निवडणूक लढवायच्या अप्रत्यक्षपणे सूचना केल्यात. मात्र, राणी लंके कोणत्या पक्षाकडून लढणार हे अजून ठरलेले नाही.

Sanjay Raut And Rani Lanke
Hiraman Khoskar : काँग्रेस आमदार खोसकरांवरील अजित पवारांच्या मेहेरबानीचे रहस्य काय?

श्रीगोंदामधील सभेत खासदार राऊत यांनी नीलेश लंके यांनी लोकसभेत इंग्रजीमधून घेतलेल्या शपथेचा उल्लेख केला. नीलेश लंके यांनी इंग्रजीमध्ये शपथ घेतली असून विधानसभेत तुम्ही कोणत्या भाषेत शपथ घेणार, असे नीलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांना विचारणा केली. ही सभा स्थानी हशा पिकला. खासदार राऊत यांनी राणी लंके यांच्या माध्यमातून पारनेर विधानसभा मतदारसंघावर दावा केल्या दिसते. त्यामुळे महाविकास आघाडीतील मित्रपक्षांच्या राजकीय भुवया उंचवल्यात.

नीलेश लंके पूर्वाश्रमचे शिवसैनिक. त्यामुळे त्यांची शिवसेनेशी असलेली नाळ अजूनही कायम दिसते. विधानसभा निवडणुकीत त्यांची नगर जिल्ह्यात महत्त्वाची भूमिका असणार आहे. यातच खासदार संजय राऊत यांनी राणी लंके यांच्याबाबत केलेले विधान हसण्यावारी घेता येणार नाही. त्यामुळे पारनेरबाबत शिवसेना ठाकरे पक्षात नक्कीच काही तरी शिजत आहे, असे दिसते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com