Nirmala Gavit & Hiraman Khoskar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nirmala Gavit : आमदार खोसकर यांनी इगतपुरीचे नाव देशभर बदनाम केले!

Nirmala Gavit Criticizes Hiraman Khoskar: बंडखोर उमेदवार माजी आमदार निर्मला गावित यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या आमदार हिरामण खोसकर यांच्या कामाचा केला पंचनामा

Sampat Devgire

Igatpuri Assembly Constituency: इगतपुरी मतदारसंघातील निवडणूक रंजक वळणावर पोहोचली आहे. माजी आमदार आणि अपक्ष उमेदवार निर्मला गावित यांनी अजित पवार पक्षाचे आमदार खोसकर यांच्यावर गंभीर आरोप केले. राजकीय दृष्ट्या आमदार खोसकर यांना माजी आमदार गावित यांनी खिंडीत गाठले.

इगतपुरी मतदारसंघ यंदा काँग्रेसच्या उमेदवाराच्या निर्णयामुळे वादग्रस्त ठरला आहे. काँग्रेस पक्षाने स्थानिक नेत्यांच्या शिफारशी विरुद्ध लकी जाधव या नवख्या उमेदवाराला उमेदवारी दिली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे हिरामण खोसकर आणि अपक्ष माजी आमदार निर्मला गावित यांच्यात चुरशीची लढत आहे.

काँग्रेसचे उमेदवार जाधव यांच्या उमेदवारी विरोधात काँग्रेसच्या 65 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. आता शिवसेना ठाकरे पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असे महाविकास आघाडीचे सर्वच पदाधिकारी अपक्ष उमेदवार माजी आमदार गावित यांच्या पाठीशी उभे आहेत. त्यामुळे ही निवडणूक अपक्ष उमेदवार गावित यांच्या उमेदवारीने चांगलीच चर्चेत आली आहे.

अपक्ष उमेदवार गावित यांनी अजित पवार पक्षाचे उमेदवार हिरामण खोसकर यांच्यावर गंभीर आरोप केले. आमदार खोसकर यांनी मतदारसंघात विकास केलेला नाही, तर निधी आणून टक्केवारीचे गैरप्रकार केले. त्यामुळे जनतेचा आणि गावांचा विकास झालेला नाही. ठराविक लोकांचा विकास आमदार खोसकर यांनी केला. या आरोपाचे उत्तर त्यांच्याकडे नाही.

आमदार खोसकर यांनी क्रॉस वोटिंग केले. त्यामध्ये मोठा गैरप्रकार केला. त्यामुळे काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली. या क्रॉस वोटिंग मुळे इगतपुरी मतदार संघाचे नाव भारतभर बदनाम झाले. या बदनामीचे कारण फक्त आमदार खोसकर हे आहेत. गुन्हा करूनही ते पुन्हा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर आरोप करीत आहेत. याला चोराच्या उलट्या बोंबा, असे म्हटले जाते.

माजी आमदार गावित यांच्या प्रचारासाठी मतदारसंघात विविध ठिकाणी सभा होत आहेत. यावेळी त्यांनी मतदारांची थेट संपर्क साधण्यावर भर दिला आहे. मी दहा वर्षे आमदार होते. चार वेळा राज्यसभा आणि विधान परिषदेसाठी मतदान केले. मात्र पक्षाच्या आदेशानुसारच वर्तवणूक केली. मी देखील क्रॉस वोटिंग करू शकले असते. मात्र आमच्यावर चांगले संस्कार आहेत.

मी तसे काही केले असते तर मतदारसंघातील मतदारांनी मला, 'ताई तुम्हाला कशासाठी निवडून दिले होते?` असा प्रश्न केला असता. त्या प्रश्नाचे उत्तर देण्याची वेळ माझ्यावर कधीही आली नाही. कारण माझे बांधिलकी फक्त माझ्या मतदार संघातील मतदारांशी आणि पक्षाशी होती. या उलट आमदार खोसकर रोज नव्या नेत्याच्या, अगदी विरोधकांच्या घरी त्याचे पाय धरायला जातात. अशी वर्तवणूक मतदारांना अपेक्षित असते का? हे कुठले राजकारण आहे?.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT