Nandurbar Election : माजी खासदार, दोन माजी मंत्री, आमदार रिंगणात; अक्कलकुवा अक्राणी विधानसभेत चौरंगी लढत

Akkalkuwa Akrani Assembly Constituency: अक्कलकुवा अक्राणी विधानसभा क्षेत्र हा काँग्रेसच्या गड मानला जातो, गेल्या 35 वर्षांपासून या मतदारसंघातून काँग्रेसचे के. सी. पाडवी हे निवडून येत आहेत.
Akkalkuwa Akrani Assembly Constituency election 2024
Akkalkuwa Akrani Assembly Constituency election 2024 sarkarnama
Published on
Updated on

सागर निकवाडे

Nandurbar News: नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा अक्राणी विधानसभेत चौरंगी लढत होत आहे. दोन माजी मंत्री, एक माजी खासदार, विद्यमान आमदार विधानसभेच्या रिंगणात आहेत. यामुळे अक्कलकुवा अक्राणी विधानसभेसाठी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

अक्कलकुवा अक्राणी विधानसभा क्षेत्र हा काँग्रेसच्या गड मानला जातो, गेल्या 35 वर्षांपासून या मतदारसंघातून काँग्रेसचे के. सी. पाडवी हे निवडून येत आहेत. 2019 च्या निवडणुकीत के.सी. पाडवी यांनी निसटता विजय मिळवला असला तरी या मतदारसंघात त्यांचा दबदबा आजही कायम आहे.

राज्यातील क्रमांक एकचा मतदार संघ असलेल्या अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघात नंदुरबार जिल्ह्यातील सर्वात मोठी लढत होणार आहे. गेल्या 35 वर्षांपासून के. सी. पाडवी अक्कलकुवा विधानसभेचे आमदार आहेत. या मतदारसंघात यावेळी सर्वाधिक चुरस पाहायला मिळत आहे.

Akkalkuwa Akrani Assembly Constituency election 2024
Kokan Politics : सावंतवाडीत 'संशयकल्लोळ' सुरु; बंडखोर कुणाची मते पळविणार? केसरकर, तेलींना टेन्शन

2024 च्या या लोकसभा निवडणुकीत त्यांनी त्यांचे चिरंजीव गोवाल पाडवी यांना उभे करीत निवडून आणलं. दोन टर्म खासदार असलेल्या डॉ. हिना गावित यांचा पराभव करीत 1 लाख 59 हजार मतांनी गोवाल पाडवी यांनी विजय मिळवला. यामुळे नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेसला चांगले दिवस आले असले तरी ते किती दिवस टिकणार हे पाहणं महत्वाचं असेल.

लोकसभा निवडणुकीचा वचपा काढण्यासाठी माजी खासदार हिना गावित आता थेट विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उभ्या ठाकल्या आहेत. माजी मंत्री असलेल्या के. सी. पाडवी यांना त्यांनी आव्हान दिले आहे. लोकसभा निवडणुकीच्या बदला घेण्यासाठी त्यांनी डॉक्टर हिना गावित यांनी अक्कलकुवा अक्राणी विधानसभेतून उमेदवारीची मागणी केली होती.

मात्र महायुतीकडून ही जागा शिंदे शिवसेनेला सुटली असून विद्यमान विधान परिषदेचे आमदार आमशा पाडवी यांना महायुतीतील नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी लोकसभेत काँग्रेसला मदत केल्याने हिना गावित यांचा पराभव झाला. यामुळे ही जागा भाजपला द्यावी, अशी मागणी गावीत त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली होती, मात्र तरीदेखील ही जागा शिवसेनेला मिळाली.

Akkalkuwa Akrani Assembly Constituency election 2024
Amit Shah: उद्धवजी, 'या' महान व्यक्तींबाबत काँग्रेस नेत्यांना दोन शब्द बोलायला सांगा! शहांचे ठाकरेंना चॅलेंज

हिना गावित यांनी भाजप सदस्य पदाचा आणि राष्ट्रीय प्रवक्ते पदाचा राजीनामा देत अपक्ष उमेदवारी करण्याच्या निर्णय घेतला. त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या असून आपण खासदार असताना या मतदारसंघात अनेक विकास कामे केली असून त्यामुळे येथील जनता मला निवडून देईल, असा विश्वास देखील हिना गावित यांनी साम टीव्हीशी बोलताना व्यक्त केला.

दुसरीकडे शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांनी आपल्या मुलासाठी उमेदवारीची मागणी केली होती मात्र त्यांच्या मुलाला उमेदवारी न देता शिवसेना शिंदे गटांनी त्यांनाच महायुतीच्या उमेदवार म्हणून घोषित केल्याने महायुतीत अंतर्गत वाद निर्माण झाला आहे.

2019 मध्ये आमश्या पाडवी हे शिवसेनेचे उमेदवार होते, त्यावेळी मात्र थोड्याफार फरकाने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. गेल्या 35 वर्षांपासून के. सी. पाडवी हे आमदार आहेत, मात्र या भागाचा त्यांनी कोणताही विकास केलेला नाही, आदिवासींना न्याय मिळाला नाही, म्हणूनच मी विधानसभा निवडणूक लढवण्याचे निश्चित केला असल्याचं आमश्या पाडवी यांनी सांगितलं.

काँग्रेसचे नेते आणि माजीमंत्री असलेले पद्माकर वळवी यांनी काही महिन्यांपूर्वीच काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपा प्रवेश केला मात्र काही दिवसातच त्यांनी भाजपालाही राम राम करत पक्षाचा राजीनामा दिला. काँग्रेसचे के. सी. पाडवी यांच्याशी मतभेद असल्याने त्यांनी थेट के सी पाडवींना आवाहन देत त्यांच्याच मतदार संघातून आदिवासी पार्टीच्या वतीने ते उमेदवारी करत आहेत. पद्माकर वळवी यांच्या उमेदवारीमुळे काँग्रेसचीच डोकेदुखी वाढली आहे, याचा नेमका फायदा कोणाला होणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचे असणार आहे.

2019 च्या विधानसभा निवडणूक मिळालेली मते

1 ) 2019 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे के. सी. पाडवी यांना 82 हजार 770 मते मिळाली होती. त्यांचा विजय झालं होता.

2 ) 2019च्या निवडणुकीत शिवसेनेचे आमश्या फुलजी पाडवी यांना 80 हजार 674 मते मिळाली होती. 2096 मतांनी आमश्या पाडवी यांचा पराभव झाला होता.

अक्कलकुवा अक्राणी विधानसभेतील जातीय समीकरण...

नंदुरबार जिल्हा हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो, नंदुरबार जिल्ह्यातील चारही मतदार संघ आदिवासींसाठी आरक्षित असून अक्कलकुवा विधानसभा देखील आदिवासींसाठी राखीव या मतदार संघात 80% मतदार हे आदिवासी आहेत त्या पाठोपाठ या मतदारसंघात अनुसूचित जाती 2 टक्के ,इतर मागास वर्गीय 10 टक्के , अल्पसंख्यांक 2 टक्के आणि खुला प्रवर्ग 6 टक्के मतदार असून सर्वाधिक मतदार आदिवासी आहेत...

अक्कलकुवा मतदारसंघात गेल्या 35 वर्षांपासून काँग्रेसचे के. सी. पाडवी निवडून येत आहेत. मात्र आजही धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात अनेक गावांना जोडणारे रस्ते नाहीत तर दुसरीकडे अनेक नद्यांना पूल नसल्यामुळे गर्भवती महिलांना बांबूच्या झोळीत जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याची स्थिती आजही या भागात कायम आहे.

सीताफळ आणि आमचुल प्रक्रियेचं हब

या भागात आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध नसल्यामुळे त्यांना रोजगार असतात इतर जिल्ह्यात आणि राज्यात स्थलांतर करावं लागत असल्याची भीषण परिस्थिती या भागात आहे. सीताफळ आणि आमचुल प्रक्रियेचं हब मानला जाणाऱ्या या धडगाव तालुक्यात आजपर्यंत एकही उद्योग धंदा निर्माण झालेला नाही.

वीज आणि नेटवर्कची समस्या हे देखील या भागात कायम असल्यामुळे या भागातील आदिवासींच्या मरण यातना संपत नसल्याची स्थिती आहे. या मतदारसंघात 80 टक्के जनता ही आदिवासी असल्यामुळे आदिवासींच्या कौल निर्णय ठरणार आहे, या विधानसभेच्या प्रतिनिधित्व येणाऱ्या काळात कोण करतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com