Nitesh Rane Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nitesh Rane : कुंभमेळ्यात दुकाने कोणाची लागणार? नाशिकमध्ये नीतेश राणेंचे मोठे विधान

Nitesh Rane On Nashik Kumbh Mela : नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मत्स्य व बंदरेमंत्री नीतेश राणे यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

Ganesh Sonawane

Nashik Politics : हिंदूंचा पैसा हिंदूंनाच मिळाला पाहीजे ही माझी ठाम भूमिका आहे. नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी कुंभमेळ्यात आणि सर्व देवस्थान परिसरात एकही अहिंदू व्यावसायिक नको, तर केवळ हिंदूंचीच दुकाने लागली पाहीजेत. हिंदूंनी हिंदूंकडूनच खरेदी करावी, हा उपक्रम त्यासाठीच आहे. अशी भूमिका राज्याचे मत्स्य व बंदरेमंत्री नीतेश राणे यांनी स्पष्ट केली.

नाशिकमध्ये 'हिंदू हित रक्षा नाशिक' या संस्थेतर्फे झालेल्या ‘हिंदूंचा रुपया हिंदूलाच’ या कार्यक्रमात हिंदू कारागीर व लघुव्यावसायिकांच्या यादीचे प्रकाशन व वेबसाईटचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नीतेश राणे बोलत होते. नाशिकच्या गंगापूर रोडवरील वृंदावन लॉन्स येथे हा कार्यक्रम झाला.

हिंदूंच्या हिताविषयी हिंदूराष्ट्रात बोलायचे नाही, तर कुठे बोलायचे? व्यवहार करताना समोरचा हिंदू आहे का हेही पाहिले पाहिजे. सिंहस्थ कुंभमेळा हा हिंदू धर्माचा उत्सव आहे. त्यामुळे त्या ठिकाणी हिंदूंचीच दुकाने असावीत, अशी आमची भूमिका असल्याचे नीतेश राणे म्हणाले. जर इतर धर्मियांच्या भागात हिंदूंची दुकाने चालत नसतील तर सर्वधर्मसमभावाची भूमिका एकट्या हिंदूंनी कुठवर घ्यावी, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

काही गोष्टी इतर धर्मीय पाळत असतील, तर आपणही काही गोष्टी का पाळू नयेत? मी कुराणही वाचले आहे. इतर धर्मांचे ज्ञान घेतल्याशिवाय ते काय आहे, हे कसे कळणार? 'लव्ह जिहाद' साठी आपल्या पैशांचा वापर होतो. त्यामुळे कोणाकडून खरेदी करायची, याचा निर्णय समाजाने घ्यावा. आपल्याच पैशांवर मोहिमा आखून आपल्याच माता बघिंनीना त्रास दिला जातो. असे असेल तर आपण त्यांना पाठिंबा का द्यायचा याचा विचार करण्याची वेळ आली असल्याचे नीतेश राणे म्हणाले.

हिंदूंच्या श्रद्दा, भावनांचा आदर न करणाऱ्या आणि जिहादी मानसिकता बाळगणाऱ्या व्यावसायिकांशी आर्थिक व्यवहार करु नयेत असे आवाहन नीतेश राणे यांनी केले. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना हिंदूंच्या धार्मिक सोहळ्यामध्ये हिंदूंची दुकाने असावीत आणि जिहादी मानसिकता असलेल्या व्यावसायिकांना जागा देऊ दिली जाणार नाही असे त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT