Mojtaba Khamenei Death : इराणला पुन्हा धक्का! सर्वोच्च नेता मोजतबा खामेनेई यांचा मृत्यू? डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा

Donald Trump makes a sensational claim that Iran Supreme Leader Mojtaba Khamenei may not have survived a joint US-Israel attack, escalating global political tension : इराणचा सर्वोच्च नेता मोजतबा खामेनेई जिवंत नसल्याचा दावा अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.
Mojtaba Khamenei
Mojtaba KhameneiSarkarnama
Published on
Updated on

US Israel Attack Iran : अमेरिका-इस्त्रायलने इराणवर हल्ले तीव्र केले आहेत. उत्तर कोरिया देखील युद्धात उडी घेण्याच्या तयारीत आहे. या युद्धाच्या सुरवातीला इराणचा सर्वोच्च नेता आयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला.

यानंतर त्यांचा पुत्र मोजतबा खामेनेई यांचा मृत्यू झाल्याचा दावा, अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या दाव्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारण खळबळ उडाली आहे.

अमेरिका-इस्रायलने इराणविरोधात (Iran Israel War) युद्ध सुरू केल्यानंतर, 28 फेब्रुवारीला इराणचा सर्वोच्च नेता आयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. यानंतर इराणध्ये आयतुल्ला खामेनेई यांचे पुत्र मोजतबा खामेनेई यांची सर्वोच्च नेतेपदी नियुक्ती झाली.

डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत आता मोठा दावा केला आहे. मोजतबा खामेनेई हे जिवंत नाहीत. ते जिवंत असतील तर, त्यांनी शरण यावे, असे देखील ठणकावले आहे.

Mojtaba Khamenei
Minab Girls School Attack : 150 शाळकरी मुलींच्या मृत्यूने जग हादरलं; ‘हल्ल्यामागे इराणच’, डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, "इराणला चहू बाजूने घेरलं आहे. इराण शरण येईपर्यंत कुठलीही तडजोड केली जाणार नाही. इराण अमेरिकेच्या शस्त्रांपुढे आता तडजोडीची भाषा करत आहे. मात्र, आम्ही इराणशी कोणत्याही अटीशर्थींशिवाय तडजोड करण्यास तयार नाही."

Mojtaba Khamenei
Iran–Israel War News: एक चूक अन् जीवाशी मुकले खामेनेई! 'मोसाद'ने केला गेम ; AI चा वापर

इराणचे नवे सर्वोच्च नेता मोजतबा खामेनेई यांच्या मृत्यूविषयी दावा डोनाल्ड ट्रम्प करत असले तरी, अमेरिकेने मोजतबा खामेनेई आणि त्यांच्या 9 वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांबाबत माहिती देणाऱ्यास 1 कोटी डॉलर्सचे (सुमारे 83 कोटी रुपये) बक्षीस जाहीर केले आहे. यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याबाबत शंका उपस्थित होऊ लागली आहे.

मोजतबा खामेनेई हे इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचे दुसरे पुत्र आहेत. ते कट्टरपंथी विचारसरणीचे आणि प्रभावशाली रणनीतीकार आहेत. 1980 च्या दशकात झालेल्या इराण-इराक युद्धादरम्यान त्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com