Nashik Development Project: केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नाशिककरांना कुंभमेळ्याचे गिफ्ट दिले आहे. शहरातील नाशिक-पुणे या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 60 चे विस्तारीकरण होणार आहे. लवकरच या कामाला सुरुवात होईल.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील या महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या रस्त्याला मंजुरी मिळावी म्हणून खासदार वाजे यांनी पाठपुरावा केला होता. मेट्रो प्रकल्प आणि द्वारका ते दत्त मंदिर चौक उड्डाणपूल या कामाचा त्यात समावेश होता.
सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबत प्रस्ताव पाठविला होता. मात्र हा ह्या खर्चाचा दीर्घकालीन प्रकल्प असल्याचे केंद्र शासनाचे मत होते. सचिव स्तरावर याबाबत तातडीची कार्यवाही अशक्य असल्याचे खासदार वाजे यांच्या बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
या अडचणी दूर करण्यासाठी खासदार वाजे यांनी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिककरांना निधी मिळावा, हा आग्रह कायम ठेवला होता. त्यामुळे तत्पुरता पर्याय म्हणून या महामार्गाचे सहा पदरीकरण करण्यात येणार आहे. दुतर्फा सर्विस रोड करण्यात येईल. त्यातून द्वारका ते दत्त मंदिर हा आठ पदरी रस्ता होईल यासाठी २२१.५२ कोटींचा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत एक्सवर पोस्ट टाकली आहे. या संदर्भात खासदार वाजे यांनी मंत्री गडकरी यांचे आभार मानले. मात्र मेट्रो आणि या मार्गावर उड्डाणपूल हाच नाशिककरांची कोंडी सोडविण्यासाठी आवश्यक असलेला प्रकल्प आहे. त्यासाठी पाठपुरावा कायम असल्याचे वाजे यांनी सांगितले.
सिंहस्थ कुंभमेळा तोंडावर असून येथे काही महिन्यात त्याला सुरुवात होईल. नाशिक शहरात प्रवेश करण्यासाठी उत्तर भारतातून रेल्वेने येणाऱ्या भाविकांसाठी पुणे महामार्ग हा एकमेव पर्याय आहे. त्याच्या विस्तारीकरणाला मंजुरी मिळाल्याने नाशिककरांना गडकरी यांनी गिफ्ट दिले अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.