Nashik News : नाशिकच्या विकासासाठी केंद्राकडून हवेत 700 कोटी, मनपाच्या धुरीणांना नागपूर भेटीत गडकरींचे दिल्लीला येण्याचे निमंत्रण

Nashik Development Fund : नाशिक महापालिकेच्या महापौर हिमगौरी आडके यांच्यासह शिष्टमंडळाने केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना साकडे घातले आहे.
Nashik Mayor Himgauri Adke meets Union Minister Nitin Gadkari
Nashik Mayor Himgauri Adke meets Union Minister Nitin GadkariSarkarnama
Published on
Updated on

Nashik Politics : नाशिकमध्ये पुढील वर्षी (२०२७) सिंहस्थ कुंभमेळा आहे. त्यादृष्टीने रस्ते व वाहतूक व्यवस्थेची सुधारणा करणे आवश्‍यक असून त्यासाठी ७०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी महापौर हिमगौरी आडके यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.

नागपूर येथे रविवारी (दि. २६) महापौर हिमगौरी आडके, उपमहापौर विलास शिंदे व स्थायी समितीचे सभापती मच्छिंद्र सानप यांनी मंत्री गडकरींची भेट घेतली व शहरातील अंतर्गत रस्ते, पूल तसेच महामार्गांच्या रुंदीकरणासाठी सुमारे ७०० कोटी रुपयांच्या निधी उपलब्ध करून द्यावा असे साकडे घातले. यावेळी नाशिक महापालिकेतर्फे शहराच्या विकासासाठी आवश्यक विविध प्रकल्प, अडचणी व प्राधान्यक्रमांची माहिती महापौरांनी गडकरी यांना दिली.

यावेळी गडकरी यांनी सकारात्मक संकेत देत अत्यावश्यक विकासकामांची प्राधान्यक्रमानुसार सूची तयार करून पुढील चर्चेसाठी दिल्ली येथे यावे, असे निमंत्रण दिले. त्यामुळे महापालिकेच्या धुरीणांना आता पुन्हा दिल्ली वारी करावी लागणार आहे.

नाशिकमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळा असून १२ कोटी भाविक नाशिक कुंभनगरीत दाखल होण्याची शक्यता आहे. कुंभमेळ्यादरम्यान येणाऱ्या या कोट्यवधी भाविकांच्या सुलभ प्रवासासाठी रस्ते व वाहतूक व्यवस्थेची सुधारणा करणे आवश्‍यक आहे. शहरात मोठ्याप्रमाणात वाहतूक वाढली आहे, त्यामुळे अंतर्गत रस्त्यांवरील ताण कमी करणे तसेच औद्योगिक वसाहतींना जोडणाऱ्या मार्गांचे रुंदीकरण करुन मालवाहतूक अधिक वेगवान करणे आवश्यक असून त्यासाठी निधीची आवश्यकता आहे.

पायाभूत सुविधांचा ताण वाढला

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरावर पायाभूत सुविधांचा ताण वाढला असून मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा करणे अपेक्षित आहे. कुंभमेळा प्राधिकरणाकडून अनेक प्रस्तावांना मंजुरी न मिळाल्याने विकासकामांवर त्याचा परिणाम होत आहे. नाशिक महापालिकेने ३ हजार कोटींचे २४० किमी रस्ते प्रस्तावित केले होते. मात्र त्यापैकी केवळ ११७.४ किमी रस्त्यांनाच मंजुरी मिळाली. तसेच एकुण प्रस्तावित १७ पुलांपैकी फक्त चार पुलांना हिरवा कंदील देण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com