Nashik NMC News : नाशिक महापालिकेचे आयुक्त डॉ. अशोक करंजकर लवकरच स्वेच्छा बदली होणार आहे. त्यांच्या जागेवर कोणाची नियुक्ती होणार यावरून महायुतीचे दोन मंत्री ईरेला पेटल्याची चर्चा आहे. त्यामुळे आयुक्तपदी कोण असावे यासाठी या मंत्र्यांना `रस` घेण्याचे कारण काय, यावर समर्थकांत कुजबूज आहे.
शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे नेते दादा भुसे हे नाशिकचे पालकमंत्री आहेत. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे भाजपचे संघटनात्मक पालक आहेत. त्यामुळे बऱ्याचदा शासकीय कामकाज आणि अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या यावरून राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून त्यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते.
सध्या मात्र नाशिक महापालिकेचा कारभार येथे नियुक्त होणारे अधिकारी आणि त्यांच्याकडून घेतले जाणारे निर्णय हे सगळे चर्चेचा विषय ठरले आहेत. अनेक कामांचा बोजवारा उडालेला आहे. विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुणवत्तेचा अभाव असल्याच्या तक्रारी आहेत.
महापालिकेच्या कामकाजाबाबत सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. प्रशासकीय राजवट असल्याने महापालिकेचे अधिकारी कोणालाही बांधील नाही. त्यात सगळ्यांचीच भरभराट सुरू आहे, हे लपून राहिलेले नाही. त्यामुळे या अधिकाऱ्यांबाबत आता अनेक चर्चा बाहेर पडू लागले आहेत.
नाशिक महापालिकेत नवीन आयुक्त नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. या आयुक्तांच्या नियुक्तींसाठी कोणत्या मंत्र्याची पसंती असेल. हा महत्त्वाचा विषय झाला आहे. याबाबत शहरातील सत्ताधारी पक्षाचे राजकीय नेते देखील मध्यस्थीसाठी धडपडत आहेत.
यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती सत्ताधारी पक्षातील आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या निकटवर्ती आमंत्र्याकडून करण्यात आल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त कोणाच्या मर्जीने होणार, हा नवा संघर्ष सुरू आहे.
महापालिका आयुक्तांच्या नियुक्तीसाठी मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय आणि नाशिकचे संबंधित मंत्री हट्टाला पेटले आहेत. त्यावरून या दोन मंत्र्यांमध्ये सुप्त संघर्ष सुरू असल्याचे बोलले जाते. स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्यांसाठीही हा चर्चेचा विषय ठरला आहे.
सध्या महापालिकेतील सर्व अधिकारी राज्य शासनाला बांधील मानले जातात. प्रशासकीय राजवटीमुळे यापूर्वीच्या नगरसेवकांना कामकाजात हस्तक्षेप करण्याचा अधिकार राहिलेला नाही.
नाशिक महापालिकेत आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक कामे होणार आहेत. त्यावर मोठा खर्च होणार आहे. सुमारे तीन हजार कोटींच्या या आराखड्यासाठी अनेक अधिकारी देखील या नियुक्तीसाठी धडपडत आहेत. त्यासाठी हवे 'ते' देण्याची आणि करण्याची त्यांची तयारी आहे.
यामुळेच महापालिका आयुक्त कोण? यावरून महायुतीतील दोन मंत्र्यांची स्पर्धा सुरू आहे. याबाबत स्थानिक आमदारांनाही फारसे विश्वासात घेतले जात नाही. त्यामुळे हे आमदार नाराज असल्याचे कळते.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बदल्यांसाठी काही मंत्र्यांना विशेष आहे. महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांना पदावर बसविण्याचे अनेक फायदे असतात. त्यासाठीही सत्ताधारी महायुतीतील मंत्र्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली असावी.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.