Shirish Kotwal Politics: भाजपला सत्ता जाण्याची भरली धडकी, म्हणून बहीण झाली लाडकी!

Maharashtra Politics : नांदगाव मतदार संघावर काँग्रेसने केला दावा, शिवसेना ठाकरे गटाची होणार अडचण.
Suhas Kande & Shirish Kotwal
Suhas Kande & Shirish KotwalSarkarnama
Published on
Updated on

Congress Vs BJP: नांदगाव विधानसभा मतदारसंघावर आता काँग्रेस पक्षाने दावा केला आहे. हा काँग्रेसचा पारंपारिक मतदार संघ आहे. त्यामुळे पक्षाने ही जागा आपल्याकडे घ्यावी,असा आग्रह पदाधिकाऱ्यांनी केला.

काँग्रेस पक्षाची आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नांदगाव येथे बैठक झाली. यावेळी जिल्हा अध्यक्ष, माजी आमदार शिरीष कोतवाल यांनी महायुती आणि भारतीय जनता पक्षावर टीका केली. भारतीय जनता पक्षाचा लोकसभेच्या निवडणुकीत दारुण पराभव झाला आहे. त्याची प्रतिबिंब विधानसभा निवडणुकीत उमटलेले दिसेल असा दावा त्यांनी केला.

भाजपने त्यांच्या पक्षात प्रवेश केलेल्या भ्रष्टाचारी राजकीय नेत्यांना अभय दिले. निरपराध राजकीय नेत्यांना खोट्या प्रकरणात अडकवले. अनेक विरोधी पक्षातील नेत्यांना जेलमध्ये टाकले. भ्रष्टाचारी नेत्यांना मंत्री केले.

गद्दारीची आणि खोटारडे पणाची ही राजकीय परंपरा जनतेला पसंत नाही. त्यामुळेच लोकसभेत महायुतीचा दारुण पराभव झाला. आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात हमखास सत्तांतर होईल, असा दावा कोतवाल यांनी केला.

Suhas Kande & Shirish Kotwal
Chhagan Bhujbal : सर्व्हर समस्येमुळे राज्य सरकार स्वस्त धान्य दुकानदारांपुढे नमले?

भारतीय जनता पक्षाचे नेते सध्या रोज नवे खोटे बोलत आहेत. त्यांनी केलेल्या कोणत्याही घोषणा सत्यात आलेल्या नाहीत. त्यांच्या योजनाही स्वार्थासाठीच आहेत. या पक्षाला आता जनतेचे मतदान मिळणार नाही. मतदान होऊ शकत नसल्याने भाजपला धडकी भरली आहे. त्यामुळे सध्या बहीण लाडकी झाली आहे, अशी खोचक टीका त्यांनी केली.

यावेळी माजी आमदार अनिल आहेर, मतदार संघाचे अध्यक्ष हरेश्वर सुर्वे, उदय आप्पा पवार, अशोक बाबा डगळे, डॉ पुंजाराम आहेर, कैलास गायकवाड, रामदास पाटील यांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी नांदगाव मतदार संघ काँग्रेस पक्षालाच मिळावा अशी मागणी केली.

नांदगाव विधानसभा मतदारसंघात गेले सहा महिने राजकारण तापले आहे. आमदार सुहास कांदे यांनी शिवसेना ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करीत शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. सत्तेचा लाभ आणि मतदारसंघाचा विकास व्हावा म्हणून असा निर्णय घेतल्याचे त्यांचा दावा आहे.

Suhas Kande & Shirish Kotwal
Shivsena Shinde Group: मुख्यमंत्री शिंदेंची शिवसेना महायुतीचे जागावाटपाचे गणित बिघडणार?

आमदार कांदे यांच्या विरोधात एकाच वेळी मंत्री छगन भुजबळ आणि शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक पद्धतीने व्युव्हरचना केली आहे. शिवसेना ठाकरे गट आणि आमदार कांदे यांच्यातील राजकीय वाद टोकाला गेला आहे.

या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाविरुद्ध महाविकास आघाडीचा शिवसेना ठाकरे गट अशी लढत होईल, असे संकेत आहेत. त्यात आता काँग्रेसने नवा डाव टाकला आहे. त्यामुळे जागा वाटपात नांदगाव वरून नवी ठिणगी पडेल हे नक्की.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com