Chhatrapati Sambhajiraje Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik News; संभाजीराजेही पदवीधरच्या प्रचारात उतरणार!

स्वराज्य संघटनेचे उमेदवार सुरेश पवार यांनी थेट गाठीभेटींद्वारे सुरु केला प्रचार

Sampat Devgire

नाशिक : (Nashik) पदवीधर मतदारसंघात स्वराज्य संघटनेने (Swarajya Sanghtana) देखील आपला उमेदवार उतरवला आहे. संघटनेचे उमेदवार सुरेश पवार (Suresh Pawar) सध्या प्रत्यक्ष गाठीभेटींद्वारे प्रचारात सक्रीय आहेत. दोन तीन दिवसांनी खासदार संभाजीराजे (Chattrapati Sambhajiraje) या निवडणुकीसाठी नाशिकला येत आहे. त्यामुळे निवडणुकीला नेव वळण मिळेल, असा दावा स्वराज्य संघटनेचे संपर्क प्रमुख करण गायकर (Karan Gaikar) यांनी सांगितले. (Swarajya Sanghtana contesting first election of Nashik Graduate constituancy in maharashtra)

छत्रपती संभाजीराजे यांच्या स्वराज्य संघटनेनेचे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार सुरेश पवार यांनी प्रचार सुरु केला आहे. संपर्क प्रमुख करण गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य डीटीएड- बीएड स्टुडन्ट असोसिएशन तसेच वकिल आणि नोटरी संघाने या उमेदवाराला पत्रकार परिषदेत पाठिंबा दिल्याचे जाहीर केले.

स्वराज्य संघटनेने नाशिक न्यायालय तसेच विविध शासकीय कार्यालयांना भेटी देऊन प्रचार केला. आदिवासी विकास भवन येथे मतदारांची भेट घेऊन जिल्ह्यातील शाळांतील कर्मचाऱ्यांशी संपर्क केला जाणार आहे.

उमेदवार पवार यांनी स्वराज्य संघटनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे स्वराज्य संघटनेने त्यांच्या प्रचारात भाग घेतला आहे. यासंदर्भात लवकरच संघटनेचे प्रमुख, खासदार संभाजीराजे नाशिकला येणार आहे. प्रस्थापित पक्षांचे तसेच स्पर्धेतील अन्य उमेदवारांच्या तुलनेत अधिक जनसंपर्क आहे. संभाजीराजे यांनी पदवीधऱ निवडणुकीत लक्ष घातले आहे. त्यांच्या दौऱ्यानंतर समाजातील विविध घटकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळेल असा दावा, श्री. गायकर यांनी केला.

स्वराज्य संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी प्रचाराचे नियोजन केले आहे. ॲड कैलास पाटील, अॅड शरद गायधनी,अॅड. संजय गीते, अॅड कृष्णकांत तांबे, अॅड नवनाथ कांडेकर, अॅड मयूर पांगारकर, अॅड शरद मोगल, डी.टी.एड., बी. एड. स्टुडन्ट असोसिएशनचे अध्यक्ष संतोष मगर, सहसचिव रेणुका गायकवाड, योगेश गांगुर्डे आदी यावेळी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT