Eknath Shinde and Devendra Fadanvis Latest News
Eknath Shinde and Devendra Fadanvis Latest News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

आता बंडखोर आमदारांमध्ये मंत्रीपदासाठी रस्सीखेच; फडणवीस, शिंदेची डोकेदुखी वाढली

कैलास शिंदे

जळगाव : शिवसेनेचे (Shivsena) बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्याने शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आपला राजीनामा द्यावा लागला. यामुळे राज्यातील सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi) सत्तेतून बाहेर पडावे लागले आहे. आता भाजप (BJP) आणि बंडखोर शिंदेगटाकडून सत्ता स्थापन केली जाणार आहे. दरम्यान जळगाव जिल्ह्यातील बंडखोर आमदारांमध्ये मंत्रीपदासाठी मोठी रस्सीखेच सुरू झाली आहे. यामुळे देवेंद्र फडणवीस आणि शिंदे हे जिल्ह्यातील जातीय समीकरण कसे सोडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जळगाव जिल्ह्यातून बंडखोरी करणाऱ्या आमदारांमध्ये एक अपक्ष व चार शिवसेना आमदारांचा समावेश आहे. त्यामध्ये मंत्रिपद सोडून आलेले गुलाबराव पाटील यांचे मंत्रिपद निश्चित मानले जात आहे. तर पाचोरा येथील आमदार किशोर पाटील हे शिंदेंच्या जवळचे असल्याने त्यांचेही मंत्रिपद निश्चित असल्याचे बोलले जात आहे. तर भाजपकडून गिरीश महाजन याना मंत्रिपद मिळणार आहे.

गुलाबराव पाटील आणि महाजन हे गुर्जर समाजाचे आहेत. तर किशोर पाटील हे राजपूत समाजाचे आहेत. जळगाव जिल्ह्यात मराठा व लेवा पाटील समाज बहुसंख्य आहे. अशा स्थितीत या समाज्याच्या मंत्रिमंडळात प्रतिनधीत्व मिळण्याची अपेक्षा आहे. कारण याआधी मधुकरराव चौधरी, जे.टी. दादा महाजन तर युतीच्या काळात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे याना संधी देण्यात आली होती. त्यामुळे या समाजाला प्रतिनिधित्व मिळणार का? याकडेही लक्ष लागले आहे. समाजाचे सुरेश भोळे हे आता भाजपकडून दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत. तर मराठा समाजालाही प्रतिनिधित्व मिळण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान, शिवसेनेच्या बंडखोर गटात चिमणराव पाटील व अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील मराठा समाजाचे आहेत. यामध्ये चिमणराव पाटील जेष्ठ असल्याने राज्यात शिवसेनेचे सरकार आल्यानंतर त्यांना अपेक्षा होती, मात्र ती त्यांना मिळाली नाही. अनेक वर्षे शिवसेनेत काढल्यानंतर त्यांनी बंड केले आहे. त्यांना यामुळे मंत्रीपदाची अपेक्षा आहे. शिवाय बंडखोरी केलेल्या आमदारात तीन महिला असून त्यापैकी लता सोनवणे या चोपडा मतदार संघातील आहेत. या गटातील महिलेला संधी दिल्यास सोनवणे यांचे नाव चर्चेत आहे. तसे झाल्यास जिल्ह्यात कोळी समाजालाही मंत्रिपदाची प्रथमच संधी मिळू शकते. यामुळे हे समीकरण भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे कसे सोडवतात. हे बघाव लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT