Dr. Vijaykumar Gavit Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dr. Vijaykumar Gavit News : आता आदिवासी शाळांचेही होणार डिजिटायझेशन

Sampat Devgire

Nashik trible News : आदिवासी आणि दुर्गम भागातील शाळांची स्थिती, सुविधा यांसह विद्यार्थ्यांची व शिक्षकांची गुणवत्ता याबाबत राज्य शासन सातत्याने विविध दावे करीत असते. आता त्यात डिजिटायझेशनची भर पडणार आहे. आदिवासी शाळांचे डिजिटायझेशन करण्याचा निर्धार राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केला. (Dr. Vijsykumar Gavit will take a new initiative for trible schools)

नंदूरबार (Nandurbar) तसेच नाशिक (Nashik) विभागातील आदिवासी (Trible) शाळांतील शिक्षकांमध्ये अतिशय चांगली क्षमता आहे. त्याचा उपयोग आदिवासी विद्यार्थ्यांच्या क्षमतावाढीत केला जाईल, असे आदिवासी विकासमंत्री गावित (Dr. Vijaykumar Gavit) म्हणाले.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते.

डॉ. गावित पुढे म्हणाले, ग्रामीण, आदिवासी भागातील शिक्षकांनी काळानुसार अपडेट राहणे गरजेचे आहे. शिक्षकांनी सध्याच्या शिक्षण प्रवाहातील नवतंत्रज्ञान त्यांनी आत्मसात करायला हवे. यासह शाळांना लागणाऱ्या इंटरनेट, ब्रॉडबॅंड, संगणक, दूरचित्रवाणी संच यांसारख्या सर्व माहिती- तंत्रज्ञान सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची परिस्थिती असते, कैक किलोमीटर अंतरावर शाळा असते. रस्ते खडतर असतात, काही शाळा एक शिक्षकी असतात, अशा परिस्थितीतही गुणवत्ता यादीत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे आवर्जून कौतुक होते. या कौतुकाचे खरे श्रेय आदिवासी भागातील खडतर परिश्रम करणाऱ्या शिक्षकांचे असते.

या वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हीना गावित, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, शिक्षण सभापती गणेश पराडके, महिला व बालकल्याण सभापती संगीता गावित, समाज कल्याण सभापती शंकर पाडवी, जिल्हा परिषद सदस्य शांताराम पाटील, रूपसिंग तडवी, सुरेश नाईक उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT