Swabhimani Shetkari Sanghatana Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahmednagar News: खासगी दूध संघांच्या दर कपातीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक; राहुरीत 'रास्तारोको'

Swabhimani Shetkari Sanghatana : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीत रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

सरकारनामा ब्यूरो

राजेंद्र त्रिमुखे :

Ahmednagar News: शासनाने नुकतेच दुधाच्या ३:५ /८:५ या गुणप्रतीस ३४ रुपये भाव घोषित केला आणि तसे आदेश काढल्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घोषित केले होते. मात्र, कोल्हापूर, सांगली वगळता इतर जिल्ह्यातील खासगी दूध कंपन्यांच्या या गुणप्रतीमध्ये 'एसएनएफ'मध्ये (SNF) पॉईंट एकने फरक पडला तर एक रुपये दर कमी करण्यास सुरुवात केली आहे.

त्यामुळे अनेक दूध उत्पादक शेतकऱ्यांना 'एसएनएफ'मध्ये (SNF) पॉईंट नुसार तीस रुपयांपर्यंत कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांत प्रचंड नाराजी आहे. या नाराजीचा सूर आज राहुरी शहरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 'रास्तारोको' करून व्यक्त केला. यावेळी अंगावर दूध ओतून घेत रस्त्यावर दूध ओतून देण्यात आले. स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली हजारोच्या संख्येने शेतकरी रस्त्यावर उतरले होते.

माजी खासदार राजू शेट्टी यांनी या आंदोलनाचे समर्थन करत खासगी दूध कंपन्या शेतकऱ्यांची फसवणूक करत असून शासन बघ्याची भूमिका घेत असल्याचा निषेध केला. सरकारने ठरवलेली गुणप्रत कुठेही मिळणार नाही, हे माहीत असताना ठरवलेली गुणप्रत बदलून ३:२ /८:३ या गुणप्रतीस ३४ रुपये भाव जाहीर करावा, अशी मागणी करत अन्यथा ऐन अधिवेशन काळात आम्हांला आंदोलन करावे लागेल, असा इशाराही दिला.

याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र मोरे म्हणाले, "महाराष्ट्र शासनाने गायीच्या दुधासाठी महाराष्ट्रात ३.५/८.५ गुणप्रतीस ३४ रुपये दराचा अध्यादेश म्हणजे दूध उत्पादकांची शुद्ध फसवणूक आहे. शासनाने दोन ओळीचा अध्यादेश काढला आणि सगळे मंत्रिमंडळ स्वतःचीच पाठ थोपटून घेण्यात मग्न आहे.

शासनाने ३.५/८.५ गुणप्रतीस ३४ रुपये दर असा उल्लेख सोडून कोणतीही मार्गदर्शक नियमावली जारी केली नाही. त्यामुळे पुणे, सोलापूर, सातारा, नगर या जिल्ह्यातील प्रमुख सहकारी व खासगी 'दूध' संघांनी आपापल्या हिशोबाने मनमानी करण्यास सुरुवात केली आहे", असं रवींद्र मोरे म्हणाले.

विखे पाटलांना पाठवलेल्या निवेदनात काय मागण्या करण्यात आल्या?

- दुधाच्या ३:२ /८:३ या गुणप्रतीस ३४ रुपये भाव जाहीर करावा.

- एस.एन.एफ.चा २० पैसे तर फॅटचा ३० पैसे डिडक्शन दर निश्चित करावा.

- तेलंगणा व कर्नाटक राज्यांच्या धर्तीवर शेतकऱ्यांना प्रती लिटर ५ रुपये अनुदान मिळावे.

- शेतकऱ्यांच्या पशुधनाला मोफत विमा संरक्षण मिळावे.

- डबल टोल दुधाला बंदी आणावी.

Edited by - Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT