BRS and MLA Babanrao Pachpute
BRS and MLA Babanrao PachputeSarkarnama

Ahmednagar Politics: कामगारांचे थकीत पैसे देण्यासाठी 'बीआरएस'चा आमदार पाचपुतेंच्या कारखान्याविरोधात एल्गार

MLA Babanrao Pachpute News: भारत राष्ट्र समितीचे श्रीगोंदा तालुका समन्वयक टिळक भोस यांचा आंदोलनाचा इशारा
Published on

राजेंद्र त्रिमुखे :

Ahmednagar News: श्रीगोंदा तालुक्यातील भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांचे पुत्र विक्रमसिंह पाचपुते यांच्या मालकीचा असलेल्या हिरडगाव येथील साईकृपा खासगी साखर कारखान्याच्या संभावित विक्रीच्या अनुषंगाने आता कामगारांचे थकीत पैसे देण्यावरून भारत राष्ट्र समितीच्यावतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

ही रक्कम कोट्यवधींची असल्याचे सांगण्यात येत आहे. साईकृपा साखर या कारखान्याची विक्री होणार असल्याची माहिती तालुक्यात असल्याने, यापूर्वी केलेल्या कामांची शेतकरी, कामगार, वाहतुकदारांची देणे ही काही कोटींच्या घरात असल्याचा आरोप भारत राष्ट्र समितीचे श्रीगोंदा तालुका समन्वयक टिळक भोस यांनी केला आहे.

BRS and MLA Babanrao Pachpute
Nana Patole Big Statement : '' पुढील आठवड्यात विधानसभेचा विरोधी पक्षनेता पाहायला मिळेल...'' ; पवारांसोबतच्या बैठकीनंतर पटोलेंचं मोठं विधान

"हा कारखाना वैयक्तिक असल्याने विकण्यास आमचा विरोध नाही. मात्र, वर्षानुवर्षे या कारखान्यात काम केलेले कामगार, शेतकऱ्यांनी दिलेला ऊस, आणि वाहतुकदारांचा खर्च या सर्व गोष्टींची देणे (पैसे) या कारखान्याचे मालक आणि त्यांचे भागीदार यांनी त्वरित अदा करावीत आणि त्यांचे प्रश्न मिटवावेत, ही आमची मुख्य मागणी आहे", असं 'बीआरएस'चे समन्वयक टिळक भोस यांनी म्हंटले आहे.

BRS and MLA Babanrao Pachpute
Shravan Hardikar Transfer : फडणवीसांच्या मर्जीतील हर्डीकर पुन्हा नागपुरात; मुंबईतून अवघ्या तीन महिन्यात बदली

पाचपुते कुटुंबाने कामगार शेतकरी वाहतुकीदार यांची कोट्यावधीची देणे त्वरित मिटवावीत, अन्यथा येणाऱ्या सोमवारपासून श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर भारत राष्ट्र समितीच्या झोपडी कार्यालयामध्ये तक्रारदारांच्या सर्व तक्रारी नोंदवून घेऊन पुढील तीव्र आंदोलन पक्षाच्यावतीने करण्यात येईल, असा इशारा टिळक भोस यांनी दिला. त्यामुळे यावर आता आमदार बबनराव पाचपुते काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणं महत्वाचे असणार आहे.

Edited by - Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com