ACB Team Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

One Crore Bribery Case : एक कोटी लाच प्रकरण; ‘वाघ’च्या शोधासाठी ‘लाचलुचपत’चे पथक ऐन दिवाळीत ‘ऑन ड्यूटी’

Pradeep Pendhare

Nagar Bribery Case : देशभरातील नागरिक दिवाळीचा आनंदोत्सव साजरा करत आहेत. पण, नाशिक लाचलुचपत विभागाचे पथक मात्र मोहिमेवर आहे. नगरमध्ये एक कोटी रुपयांच्या लाच प्रकरणात पसार असलेला कार्यकारी अभियंता गणेश वाघ याच्या शोधासाठी पथक विविध ठिकाणी छापेमारी करत आहे. (One crore bribery case; Team 'on duty' during Diwali holiday to search for 'Ganesh Wagh')

दरम्यान, याचप्रकरणी सहायक अभियंता अमित गायकवाड याला नगर जिल्हा न्यायालयात मंजूर झालेल्या जामिनाविरोधात उच्च न्यायालयात अपिल करण्यात आले आहे. गुन्ह्याचे गांभीर्य मोठे आहे. गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार वाघ पसार असून, तपासावर परिणाम होण्याची शक्यता आहे. गुन्ह्याच्या अनुषंगाने गायकवाडच्या चौकशीची आवश्यकता असून जामीन रद्द होण्यासाठी अपिल करण्यात यावे, अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अडीच कोटी रुपयांच्या बिल मंजुरीसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या धुळे कार्यालयातील कार्यकारी अभियंता गणेश वाघ याने छत्रपती संभाजीनगरमधील शासकीय ठेकेदाराकडे एक कोटी रुपायंची लाच मागितली होती. गणेश वाघ हा नगरच्या कार्यालयात उपविभागीय अभियंता म्हणून कार्यरत असताना ठेकेदाराने पाईपलाईनचे काम केले होते. त्या कामाच्या बिलावर गणेश वाघ याची स्वाक्षरी गरजेची होती. परंतु गणेश वाघ याची धुळे येथे बढतीवर बदली होती.

बिलावर स्वाक्षरीसाठी गणेश वाघ याने नगर कार्यालयातील सहायक अभियंता अमित गायकवाड याच्यामार्फत लाचेची रक्कम स्वीकारण्याची तयारी केली. लाचेची रक्कम स्वीकारत असतानाच अमित गायकवाड याला लाचलुचपत विभागाच्या नाशिक पथकाने ताब्यात घेतले. नगरच्या एमआयडीसी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल आहे. परंतु पथकाने लाचेची कारवाई केल्यापासून गणेश वाघ पसार आहे.

गणेश वाघ याच्याबरोरबच त्याचे नातेवाईकदेखील पसार झाले आहेत. यामुळे पथकाने गणेश वाघ याच्याविरोधात लूक आऊट नोटीस बजावली आहे. लाचेची कारवाई झाल्यापासून गणेश वाघ याच्या शोधासाठी पथक कार्यरत आहे. दिवाळीतही पथक मोहिमेवर आहे. वेगवेगळ्या ठिकाणी कार्यवाही करत आहे. परंतु गणेश वाघ हा गुंगारा देत फिरत आहे. लाचलुचपत विभागाचे पथक राज्य आणि परराज्यात वाघ याचा शोध घेत आहे.

दरम्यान, अमित गायकवाड याला नगर जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला. परंतु त्याविरोधात तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांनी उच्च न्यायालयात अपिल दाखल केले आहे. गुन्ह्याचे गांभीर्य मोठे आहे. मुख्य सूत्रधार गणेश वाघ हा पसार आहे. याशिवाय त्याचे नातेवाईकही बेपत्ता आहे. गणेश वाघ याच्या शोधासाठी पथके विविध ठिकाणी कार्यरत आहे. अमित गायकवाड याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी होणे गरजेचे आहे. त्यामुळे त्याचा जामीन रद्द करावा, असे अपिल उच्च न्यायालयात करण्यात आले आहे. दिवाळीच्या सुट्या असल्याने अपिलावर तारीख मिळाली नसल्याचे स्वप्नील राजपूत यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT