Amit Thackeray Adopted village : अमित ठाकरेंनी पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत घेतली विकासासाठी दत्तक

MNS News : मनसेने वेल्हे तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत दमदार कामगिरी केली आहे.
Amit Thackeray
Amit Thackeray Sakarnama
Published on
Updated on

Pune News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून निवडून आलेल्या वेल्हे तालुक्यातील सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी मनसेचे युवा नेते तथा राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे यांची भेट घेतली. ठाकरेंनी या वेळी नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांचे अभिनंदन करून कुरण खुर्द-पानशेत ही ग्रामपंचायत विकासासाठी दत्तक घेत असल्याची घोषणा केली. (Amit Thackeray adopted one Gram Panchayat of Pune district for development)

मनसेचे पुणे जिल्हाप्रमुख संतोष दसवडकर यांच्या पुढाकाराने पक्षाचे ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंचांची ठाकरेंसोबत भेट झाली. कुरण खुर्द-पानशेत ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंचपदासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रगती रवींद्र घाडगे या जनतेतून निवडून आल्या आहेत. त्यांचा सत्कार अमित ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. त्या भेटीबाबतची माहिती दसवडकर यांनी दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Amit Thackeray
Jalgaon Politics : माजी खासदार ए. टी. पाटलांवर भाजपने सोपवली मोठी जबाबदारी; पाच वर्षांनंतर सक्रीय

मनसेने वेल्हे तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत दमदार कामगिरी केली आहे. एका ग्रामपंचायतीमध्ये मनसेचा सरपंचपदाचा उमेदवार निवडून आला असून पाच ग्रामपंचायतींमध्ये सदस्य निवडून आले आहेत, असेही दसवडकर यांनी सांगितले.

विकासासाठी दत्तक घेतलेल्या कुरण खुर्द-पानशेत या गावाचा संपूर्ण आराखडा तयार करून विविध विकास कामे ही अमित ठाकरे यांच्या माध्यमातून केली जणार आहेत. वेल्हे तालुक्याच्या विकासाचा पथदर्शी प्रकल्प उभारून एक नवीन आदर्श उभा करण्याचा प्रयत्न मनसेकडून केला जाणार आहे.

वेल्हे तालुक्यात पर्यटन क्षेत्राला मोठी संधी आहे. पानशेत परिसरातही मोठा वाव आहे. पर्यटन वाढीसाठी पायाभूत सुविधा निर्माण करून दिल्यास तालुक्यातील तरुणांना त्या माध्यमातून रोजगाराची निर्मिती होण्यास मदत होणार आहे. त्यासाठी आपण कुरण खुर्द, पानशेतचा विकास करून एक आदर्श निर्माण करु, असा संकल्पही अमित ठाकरेंनी या वेळी बोलून दाखवला.

Amit Thackeray
Uddhav Thackeray: मुंब्रा शाखा कुणाची? आमच्याकडे सगळी कागदपत्रे, ठाकरे गट न्यायालयात...

सत्ताधारी पक्ष वेल्हे तालुक्यातील प्रलंबित प्रश्नाकडे लक्ष देत नाहीत. हे प्रश्न सोडविण्यासाठी आगामी काळात मनसे आग्रही राहणार आहे. जनतेच्या प्रश्नासाठी आंदोलनाच्या माध्यमातून संघर्ष उभारण्याचा इशाराही जिल्हाप्रमुख दसवडकर यांनी दिला.

Amit Thackeray
Kapil Patil: गायकवाड, शिंदे समर्थकांमधील वादावर कपिल पाटील म्हणाले,'आमच्यात मतभेद आहेत, पण..

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com