Jalgaon Politics : माजी खासदार ए. टी. पाटलांवर भाजपने सोपवली मोठी जबाबदारी; पाच वर्षांनंतर सक्रीय

BJP News : ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांची एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली अन खळबळ उडाली.
A. T. patil
A. T. patilSarkarnama

Jalgaon : भारतीय जनता पक्षाने जळगाव लोकसभेचे तिकीट कापून तिसऱ्यांदा विजयाची संधी हुकविलेले माजी खासदार ए. टी. नाना पाटील यांना आता पुन्हा पक्षाने सक्रीय केले आहे. तेलंगणामधील दोन विधानसभा मतदार संघातील निवडणुकीची जबाबदारी पक्षाने त्यांच्यावर सोपविली आहे. पाटील हे सक्रिय झाल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील राजकीय गणिते बदलणार, हे मात्र निश्चित आहे. (BJP gave responsibility of two constituencies in Telangana Former MP A. T. patil)

भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार ए. टी. नाना पाटील जळगाव लोकसभा मतदार संघातून दोन वेळा निवडून आले होते. लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत त्यांनाच जळगाव लोकसभा मतदार संघाची भाजपची उमेदवारी मिळणार, हे निश्चित मानले जात होते. मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांची एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली अन खळबळ उडाली. त्यामुळे पक्षाने त्यांची उमेदवारी कापली, त्यामुळे लोकसभेच्या उमेदवारीची त्यांची हॅटट्रिक हुकली

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

A. T. patil
Loksabha Election : भाजप-शिंदे गटात वाद; बुलडाणा मतदारसंघावरून संजय गायकवाडांचा भाजपला इशारा

भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत खेळ करून त्यांची उमेदवारी कापण्यात आल्याची चर्चा आजही सुरु आहे. त्यानंतर ए. टी. पाटील फारसे पक्षात सक्रीय दिसले नाहीत. पक्षाच्या बैठकीत, जाहीर कार्यक्रमांमध्येही ते दिसून आले नाहीत. मात्र आता ते सक्रिय होऊ लागले आहेत.

तेलंगणा राज्य विधानसभा निवडणुकीत पक्षाचे प्रभारी म्हणून त्यांची पक्ष नेतृत्वाने नियक्ती केली आहे. दोन जिल्हे आणि तीन विधानसभा क्षेत्राची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली आहे. मेहबूबाबाद जिल्ह्यातील डोनाकल विधानसभा मतदार संघात त्यांनी उमेदवारांचा प्रचार केला. या उमेदवारांसह प्रचाराचा फोटो व माहिती त्यांनी आपल्या फेसबुकवर टाकली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय नेतृवाने आपल्या सक्रीय करून घेतल्याचे त्यांनी दाखवून दिले.

A. T. patil
Mumbra Shivsena Shakha : मुंब्र्यातील शाखा माझ्या नावावर, ठाकरेंच्या टीकेला अर्थ नाही; उद्धवराव जगतापांचे आव्हान

माजी खासदार पाटील यांच्या सक्रीय होण्यामुळे जळगाव जिल्ह्यातील भाजपचे लोकसभा निवडणुकीचे राजकीय गणित बदलणार हे मात्र निश्चित आहे. जळगाव लोकसभेचे भाजपचे उमेदवार विद्यमान खासदार उन्मेष पाटील राहणार की नवीन उमेदवार असणार, या बाबत चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर माजी खासदार पाटील यांच्या या सक्रियेतेमुळे नवीन चर्चा होणार, हेही निश्चित आहे.

A. T. patil
Solapur News : चंद्रकांत पाटलांवर शाई फेकणाऱ्या भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला तडीपारीची नोटीस

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com