Onion farmers end their hunger strike after successful talks led by Dada Bhuse during the ongoing protest in Maharashtra. sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Farmers Hunger Strike : कांदा आंदोलनाचा तिढा अखेर सुटला; दादा भुसेंच्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी उपोषण मागे!

Onion Farmers Dada Bhuse : शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे नवे केंद्र चांदवड बनले आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी येथे सुरू केलेले उपोषण मंत्री दादा भुसेंच्या मध्यस्थीने मागे घेतले आहे.

Sampat Devgire

Dada Bhuse News: केंद्रातील भाजप सरकारने निर्यात सवलती कमी करण्याचा निर्णय अवघ्या काही तासात फिरविला. मात्र निर्णयाचा नकारात्मक परिणाम कांद्याचा दर स्थिर करू शकला नाही. कांदा उत्पादक शेतकरी संतप्त होतं रस्त्यावर उतरले आहेत.

या संदर्भात डॉ आत्माराम कुंभार्डे यांसह कांदा उत्पादक शेतकरी आणि राजकीय नेत्यांनी चांदवड येथे उपोषण सुरू केले होते. कांदा दर सातत्याने कोसळत असल्याने शेतकऱ्यांवर आभाळ कोसळले आहे. नाशिक सह राज्यातील विविध भागात शेतकरी संतप्त झाला आहे. त्याचे पडसाद ठिकठिकाणी उमटले.

या संदर्भात गुरुवारी खासदार भास्कर भगरे, डॉ शोभा बच्छाव यांनी कांदा उत्पादक आंदोलकांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर केला. याबाबत केंद्र शासन जाणीवपूर्वक शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा संताप आंदोलकांनी व्यक्त केला. त्यामुळे सत्ताधारी पक्षापुढे मोठी अडचण निर्माण झाली होती.

आंदोलकांची समजूत घालण्यासाठी शिक्षण मंत्री दादा भुसे यांना पुढाकार घ्यावा लागला. मंत्री भुसे यांच्या मतदारसंघातही कांदा उत्पादक संतप्त आहेत. कांदा उत्पादकांच्या प्रश्नांसाठी राज्य शासनाकडून तातडीने कार्यवाही केली जाईल, आश्वासन मंत्री भुसे यांनी दिले. मंत्री भुसे यांच्या आश्वासनामुळे आंदोलकांनी उपोषण मागे घेतले.

कांदा आणि मका पिकाची परवड झाली आहे. बाजारात समाधानकारक दर मिळत नाहीत. ही वस्तुस्थिती मंत्री भुसे यांनी मान्य केली. या दोन्ही पिकांना हमीभाव मिळावा यासाठी, कायमस्वरूपी धोरण आखण्याची गरज आहे. त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भाग घेतला. मंत्री आणि खासदारांच्या आवाहनानंतर डॉ कुंभार्डे यांनी उपोषण मागे घेतले. खासदारांनी केंद्र शासनाकडे या प्रश्नावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

डॉ सयाजीराव गायकवाड, संजय जाधव, संपतराव वक्ते, विलास भवर, विजय जाधव, भीमराव जेजुरे, समाधान जामदार, बाजार समितीचे सभापती नितीन आहेर यांसह मोठ्या संख्येने विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी कांदा आणि मका या पिकाला भाव मिळत नसल्याने चांदवड येथे उपोषण सुरू केले होते. त्यामुळे पुन्हा एकदा चांदवड हे कांदा उत्पादक आंदोलनाचे केंद्र बनले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT