Rajya Sabha Elections : राज्यसभेचा तिढा वाढला! ठाकरेंच्या शिवसेनेतील पाच नेत्यांमध्ये रस्सीखेच; शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष!

Shiv Sena UBT Sharad Pawar Congress : राज्यसभा निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे. मात्र, शरद पवार काय निर्णय घेणार यावर उमेदवारी कोणत्या पक्षाला हे ठरणार असल्याची चर्चा आहे.
Sharad Pawar, Uddhav Thackeray
Sharad Pawar, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Rajya Sabha Elections News : राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नेत्यांमध्ये रस्सीखेच आहे. प्रियंका चतुर्वेदी यांना पुन्हा उमेदवारी मिळणार का? याची चर्चा सुरू असताना अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे, विनायक राऊत, राजन विचारे यांची नावे देखील उमेदवारीसाठी पुढे येत आहेत. त्यामुळे उमेदवारीसाठी या नेत्यांमध्ये रस्सीखेच आहे.

महाविकास आघाडीचे संख्याबळ पाहात केवळ एक उमेदवार विजयी होणार आहे. त्यामुळे ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेला मिळणार की काँग्रेसला यासाठी बैठका सुरू आहेत. शरद पवार हे देखील राज्यसभेतून निवृत्त झाले आहेत. पुन्हा राज्यसभेवर जाण्याबाबत त्यांनी अजून उघड भूमिका घेतली नाही. मात्र, त्यांच्या उमेदवारीसाठी जयंत पाटील, शशिकांत शिंदे हे अॅक्टिव्ह झाले आहेत. त्यामुळे शरद पवारांच्या भूमिकेवर उमेदवारी कोणाला मिळणार हे ठरणार आहे.

शरद पवारांनी पुन्हा राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतला तर महाविकास आघाडीत त्यांनाच उमेदवारी मिळणार हे निश्चित. काँग्रेसकडून उमेदवारीसाठी बाळासाहेब थोरात यांचे नाव आघाडीवर आहे. शरद पवार निवडणुकीच्या मैदानात उतरले नाही तर उद्धव ठाकरेंसाठी विधान परिषदेची जागा सोडून राज्यसभेची जागा आपल्याकडे ठेवण्याची रणनीती काँग्रेसने आखली आहे.

Sharad Pawar, Uddhav Thackeray
HSC Exam Paper Leak: बारावीचे दोन नव्हे तीन पेपर फुटल्याने खळबळ; तपासात धक्कादायक बाब समोर

ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष

आपल्याकडे सर्वाधिक 20 आमदार आहेत त्यामुळे उमेदवारी आपल्या पक्षाला मिळावी, अशी भूमिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने घेतली आहे. आदित्य ठाकरे हे प्रियंका चतुर्वेदी यांच्या उमेदवारीसाठी आग्रही असल्याचे बोलले जात आहे. राज्यसभेच्या जागेबाबात नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते. मात्र, आदित्य ठाकरे यांनी या बैठकीला दांडी मारली.

Sharad Pawar, Uddhav Thackeray
Pune Poitics : भाजपची राष्ट्रवादीवर कुरघोडी; क्षेत्रीय कार्यालयाच्या पुनर्रचनेत मोठा फटका

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com