Sharad Pawar
Sharad Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

शिर्डीच्या सभेला शरद पवारांची ऑनलाईन उपस्थिती!

सरकारनामा ब्यूरो

शिर्डी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) 'राष्ट्रवादी मंथन-वेध भविष्याचा' हे शिबिर आजपासून (ता. ४ नोव्हेंबर) शिर्डी (Shirdi) येथे होत आहे. या शिबिराला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी थेट रुग्णालयातून ऑनलाईन उपस्थिती लावली. (Online presence of Sharad Pawar in Shirdi meeting)

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते तसेच विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रफुल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करून या शिबिराची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून अचानक भेट देऊन संपूर्ण कार्यक्रमाला व पक्षाच्या कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळवून दिली. पवार यांनी पक्षाच्या दोन दिवसांच्या शिबिराला पहिल्या दिवशीच ऑनलाईन हजेरी लावून पुन्हा एकदा आपला शब्द राखून दाखवला आहे.

शिर्डीच्या शिबिराला उपस्थित राहून पवार हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार होते. मात्र, तब्येत अचानक बिघडल्याने पवार यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले हेाते. रुग्णालयात असूनही शरद पवार यांनी आज शिबिरात सुरुवातीलाच ऑनलाईन पद्धतीने हजेरी लावली.

या वेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री धनंजय मुंडे, आमदार अरुण लाड, आमदार अमोल मिटकरी, खासदार श्रीनिवास पाटील, सेवा दल प्रदेशाध्यक्ष डॉ. जानबा म्हस्के, सेवा दल कार्याध्यक्ष राजेंद्र लावंघरे तसेच राज्यातून आलेले अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT