Crime News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik City Police : हुक्का पार्टीच्या धुराचा नाशिक पोलिसांना ‘ठसका’

Arvind Jadhav

Nashik News : नाशिक तालुका पोलिसांनी गंगापूररोड भागातील एका शांत जागेतील हॉटेलवर कारवाई केली. संशयितांना पोलिस ठाण्यात आणण्यात आले. मात्र, यानंतर एका महिलेची एन्ट्री झाली. 'आपने किससे पंगा लिया आपको पता नही,' अशी धमकी दिली. महिलेनंतर लागलीच एका लोकप्रतिनिधीचे पीए धावपळ करीत आले. ‘खास’ पदाधिकाऱ्याचा दबाव पाहता पोलिसांनी थातूरमातूर कारवाई करून प्रकरण वाढू दिले नाही. मध्यरात्री दोन वाजेपर्यंत सुरू असलेल्या या कारवाईची दबक्या आवाजात चर्चा सुरू असून, ती महिला कोण आणि ते पीए कोणाचे, याविषयीच्या चर्चांना उधाण आले आहे.

नाशिक शहरालगतच्या शांत आणि निसर्गरम्य वातावरणात छोट्या मोठ्या हॉटेल्समध्ये हुक्का पार्ट्यांचे आयोजन होते. अवैध मद्य पुरवठा देखील होतो. यातून होणारी आर्थिक उलाढाल लक्षात घेता विविध पक्षाचे पदाधिकारी अथवा मित्र मैत्रणी अशी हॉटेल चालवण्यासाठी पुढे येतात. राजकीय वरदहस्त असला की पोलिसांचा ससेमीरा कमी होतो, हा त्यामागील उद्देश असतो.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गंगापूर धरणाच्या जवळपास असलेल्या गोवर्धन शिवारातील हॉटेलवर काल रात्री नाशिक तालुका पोलिसांनी छापा मारला. यावेळी तिथे अवैध मद्यसाठा, हुक्का साहित्य आणि सुगंधी तंबाखू सापडली. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त करीत हॉटेल व्यवस्थापक ओवेस शेख आणि मालक जकी शेख यास ताब्यात घेतले. मात्र, सदर हॉटेल एक महिला चालवते, अशी माहिती समोर आली आहे.

ही महिला रात्री पोलिस स्टेशनमध्ये पोहचली. तिने पोलिसांना दमच देत कारवाई थांबवण्यास सांगितले. ‘आपने किससे पंगा लिया आपको मालूम नही’, अशी धमकी पोलिसांना मिळाली. यानंतर एका लोकप्रतिनिधीचे ‘खास’ पीए यांनी तालुका पोलिस ठाणे गाठले. त्यांनीही आणखी राजकीय दबाव वाढवून आपले म्हणणे खरे करण्यास पोलिसांना भाग पाडले. यामुळे हॉटेल चालवणाऱ्या त्या महिलेवर कोणतीही कारवाई झाली नाही. ती महिला कोण आहे आणि ते पीए कोणत्या लोकप्रतिनिधीचे आहेत, याबाबतची चर्चा सुरू झाली आहे. 

महिला हॉटेल चालवते अन पोलिसांनी हॉटेल मालका विरोधात गुन्हा दाखल केला, ही बाब चोर सोडून संन्याशाला फाशी असल्याची भावना व्यक्त केली जाते आहे. दरम्यान, या प्रकरणावर बोलण्यास पोलिस सुद्धा तयार नसल्याने या चर्चांना खतपाणी मिळते आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT