Mahadev Jankar : ... तर 10 मिनिटांसाठी पंतप्रधान होईन

Mahadev Jankar against BJP : महादेव जानकरांनी थोपटले भाजप विरुद्ध दंड
Mahadev Jankar
Mahadev JankarSarkarnama
Published on
Updated on

Satara News : महायुतीमध्ये असून देखील राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे वारोवार भाजपाला आव्हान देताना दिसत आहेत. आता त्यांनी माढ्यातून भाजप विरोधात रासप अशी सरळ लढत होणार असल्याचे म्हंटले आहे. महादेव जानकरांनी माढा लोकसभा मतदार संघात आपली लढाई भाजप विरोधात असल्याचे म्हणत दंड थोपाटले आहेत. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान पदा बाबत आपली भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रीय समाज पक्षाचा फलटण (जि. सातारा) येथे विजयी निर्धार झाला. यावेळी जानकर बोलत होते. 

माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीत बिघाडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. याआधी भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांच्या विरोधात अजित पवार गटाचे रामराजे नाईक- निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे नाईक- निंबाळकर यांची लोकसभेच्या उमेदवारी बाबत चर्चा होत असताना. महादेव जानकर यांनी माढा आणि परभणी लोकसभा मतदारसंघातून आपले दंड थोपटले आहेत. यावेळी त्यांनी भाजपाला इशारा दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मी कधीच मुख्यमंत्री होणार नाही 


आम्हांला विचारात घेतलं नाही तर फौजदाराचा पोलीस करण्याची ताकद महादेव जानकरकडे आहे. आम्ही सोबत असू तर तुम्ही सत्तेत बसाल नाहीतर तुम्हांला बसू देणार नाही.  मी माढा मधूनच नव्हे तर परभणी मधून देखील लोकसभा निवडणूक लढवणार आणि परभणीमध्ये दोन लाखाच्या फरकाने निवडून येणार आहे. जेव्हा लोकसभा निवडणुकीत मी निवडून येऊन दिल्लीला जाईन. त्यावेळेस राष्ट्रीय समाज पक्षाचे 35 आमदार असणार आहेत. मला कधीच मुख्यमंत्री व्हायचं नाही. मी आज शपथ घेतो की मी कधीच मुख्यमंत्री होणार नाही. मात्र, तेव्हा आम्हांला विचारल्याशिवाय कोणत्याच पक्षाचा मुख्यमंत्री होणार नाही. संधी मिळालीच तर 5-10 मिनिटांसाठी पंतप्रधान होईन, असे महादेव जानकर म्हणाले. 

Mahadev Jankar
BJP On Nashik Lok Sabha Constituency :भाजपचा गेम प्लान... शिंदे, अजित पवार गटाचे धाबे दणाणले

कोणतरी म्हणतंय आम्ही शरद पवारांसोबत

मी रेल्वे देतो, पाणी देतो याची भाषा करणार नाही. सत्ता द्या महादेव जानकरचे नावच काफी आहे. सत्ता कोणाचीही असो, मी बंदोबस्त करणार आहे. नागरिकांनी विश्वास ठेवा प्रत्येक समाजाचे नेते झेंडे घेऊन येतील पण त्यांच्यापासून सावध राहा. प्रत्येक समाजाच बुजगावणं येईल. तुम्हाला उल्लू बनवतील. मी बुजगावणं म्हणून कधी मत मागायला आलो नाही. सन्मान देण्यासाठी मी येईन. कोणतरी म्हणतंय आम्ही शरद पवारांसोबत आहे, पण लक्षात ठेवा आम्ही स्वतंत्र लढणार. आमची सध्यातरी काहीही चर्चा झालेली नाही. माढा लोकसभा मतदारसंघात भाजप आणि रासपची लढत होणार अन् मी चॅलेंज देऊन सांगतो दोन्ही मतदारसंघातून मी खासदार होणार आणि दिल्लीला जाणार असल्याचा विश्वास महादेव जानकर यांनी व्यक्त केला.

Mahadev Jankar
Shirur Loksabha : अजितदादांच्या मनात नेमकं चाललंय काय? कोल्हेंचा पराभव करणारा शिरूरमधील उमेदवार कोण?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com