Dada Bhuse with onion farmers Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik News; पाकिस्तानमधील परिस्थितीमुळे कांदा दर कोसळले?

पालकमंत्री दादा भुसे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात कांदा प्रश्नावर आढावा बैठक घेतली.

Sampat Devgire

नाशिक : नाशिकसह (Nashik) राज्यात (Maharashtra) कांदा दर कोसळले. शेतकरी (Farmers) अडचणीत आले. शेतकरी प्रचंड संताप व्यक्त करीत आहेत. त्याच्या विविध कारणांत एक पाकिस्तान (Pakistan) देखील आहे. पाकिस्तान, बांगलादेशात आर्थिक चणचण असल्याने मागणी घटली. त्यामुळे दर कोसळले अशी माहिती पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी दिली. (Low deemands in Pakistan is the one reason for fall of Onion price)

पालकमंत्री दादा भुसे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात कांदा प्रश्नावर शासकीय अधिकारी व शेतकरी प्रतिनिधींसमवेत बैठक घेतली. यावेळी त्यांनी तातडीने नुकसानग्रस्त पीकांचे पंचनामे करण्याच्या सुचना दिल्या. मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नावर उपाययोजना करण्यासाठी आश्वस्त केल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी श्री. भुसे यांना कांदा प्रश्न निर्माण होण्याची कारणमिमांसा सांगितली. ते म्हणाले, सध्या पाकिस्तान, बागलादेशात आर्थिक चणचण आहे. नागरिक अडचणीत आहेत. त्यामुळे बाजारात मालाला उठाव कमी झाला आहे. कांदा दर कोसळण्याच्या विविध कारणांपैकी ते एक आहे.

कांदा दर कोसळल्याने राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहे. याबाबत नाफेडला खरेदीच्या सुचना केल्या आहेत. सव्वा लाख टन कांदा खरेदीचे लक्ष्य आहे. बाजार हस्तक्षेप योजना देखील आहे. खरेदीचे दर सध्या 400 ते 800 आहे. खरेदी सुरु झाल्यामुळे दरात 150 ते 200 रुपये दरवाढ झाली आहे. आकार कमी असल्याने सध्या कांदा घेतला जात नाही.

दादा भुसे थेट बांधावर

पालकमंत्री भुसे यांनी दुपारी विविध भागाचा दौरा करून नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. चांदोरी (ता. निफाड) येथील द्राक्ष बागांचे नुकसान, गव्हाची त्यांनी पाहणी केली. यावेळी चांदोरी येथील बाळासाहेब हिंगोले, गणपत हिंगोले यांच्या द्राक्ष बागेची तसेच बाळासाहेब घोरपडे यांच्या गव्हाच्या पिकांची पाहणी केली.

संबंधीत अधिकाऱ्यांना पंचनामा करण्याच्या सूचना देत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी शेतकऱ्यांना आश्वासीत केले. यावेळी कृषी अधीक्षक विवेक सोनवणे, प्रांताधिकारी अर्चना पठारे, शिवसेना जिल्हाध्यक्ष अनिल ढिकले, भाऊलाल तांबडे यांसह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT