BJP leader Pankaj Munde
BJP leader Pankaj Munde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

भाजपमध्ये नाराज आहात का?, या प्रश्नावर पंकजा मुंडेंचे सुचक स्मीत!

Sampat Devgire

येवला : पंतप्रधान (Narendra Modi) हे देशाचे नेते असतात. सर्वांनी त्यांचा सन्मान केला पाहिजे. त्यांच्यावर टीका टिपणी करणे व पातळी सोडून बोलणे चुकीचे आहे, असे भारतीय जनता पार्टीच्या (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी व्यक्त केले.

शहरात दौऱ्यावर आलेल्या मुंडे यांनी विधान परिषदेचे आमदार नरेंद्र दराडे व शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या निवास्थानी सदिच्छा भेट दिली. माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. आपण भाजपमध्ये नाराज आहात का? या प्रश्नावर त्यांनी क्षणभर थबकत फक्त स्मीत करीत हात जोडले.

आमदार दराडे व माजी उपमुख्यमंत्री स्व.गोपीनाथ मुंडे यांचे कौटुंबिक संबंध असल्याने आज पंकजा मुंडे यांनी दराडे बंधूच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. सामजिक विषयांवर चर्चा झाली. दराडे कुटुंबातर्फे येवल्याची पैठणी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. आमदार दराडे बंधूसह जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य सभापती सुरेखा दराडे, मीना दराडे, डॉ. कविता दराडे, सिद्धांत दराडे यांनी त्यांचा सत्कार केला. भाजपाचे नेते नगरसेवक प्रमोद सस्कर, ओबीसी आघाडीचे अध्यक्ष सुनील काटवे यांनी देखील मुंडे यांचा सत्कार केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल नाना पटोले यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना मुंडे यांनी नाव न घेता पटोले याच्यावर टीका केली. पंतप्रधान हे एका पक्षाचे नसतात. ते देशाच्या संविधानातील महत्वाचे पद असून ते संपूर्ण देशाचे असतात. त्यांच्याबद्दल कोणीही बोलताना पातळी सोडून बोलू नये. ओबीसी राजकीय आरक्षण संदर्भात बोलताना ८ फेब्रुवारीला कोर्टात निर्णय लागेपर्यंत त्याची मी प्रतीक्षा करणार आहे. मात्र पुढील निवडणुका या ओबीसी आरक्षणशिवाय होत असून याचे दुःख आहे. याप्रश्नी सरकार आपलं मत कसे मांडते याच्यावर आम्ही लक्ष ठेवून असून सरकारने प्रभावीपणे भूमिका मांडावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. भाजपमध्ये आपण नाराज आहात का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला नंतर स्मितहास्य करून मुंडे यांनी त्यावर उत्तर देणे टाळले.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT