नगराध्यक्षपदाचे भाजपचे उमेदवार संशयित तर विजयी नगरसेवक बेपत्ता!

मोहिनी जाधव मृत्यू प्रकरणी पोलिसांची तपासात होतेय कसरत
File photo of sakri death case agitation
File photo of sakri death case agitationSarkarnama

निखिल सूर्यवंशी

धुळे : साक्रीत (Dhule) भाजपकडून नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून ॲड. गजेंद्र भोसले (Adv Gajendra Bhosale) यांचे नाव घेतले जात आहे. मात्र, मोहिनी जाधव मृत्यूप्रकरणी संशयित आरोपींच्या यादीत ॲड. भोसले याचे नाव आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांच्या तपासात काय निष्पन्न होते याकडे लक्ष लागले आहे. त्यावरच भोसले यांचे भवितव्य ठरेल.

File photo of sakri death case agitation
येणाऱ्या निवडणुकीत भाजप हाच आमचा मुख्य शत्रू

यासंदर्भात साक्री वकील संघाने रोष व्यक्त करत संघाचे सदस्य ॲड. भोसले यांचे नाव राजकीय द्वेषातून गोवल्याचा आरोप केला आहे. असे असताना पिंपळनेर रोडवर पुलाजवळ गोटू जगताप आणि मोहिनी जाधवला मारहाणीवेळी ॲड. भोसले घटनास्थळी होते किंवा कसे याबाबत वास्तव तपासातून समोर येऊ शकेल, अशी चर्चा सुरु झाली आहे.

File photo of sakri death case agitation
`त्या` उड्डाणपुलाला विरोधामागे नेत्यांचे राजकारण की `अर्थकारण`

साक्री नगरपंचायतीत चाळीस वर्षानंतर प्रथमच बहुमताने भाजपने सत्ता काबीज केली. त्याचा आनंद बुधवारी सायंकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास भाजपच्या साक्री येथील कार्यालयात सत्काराच्या कार्यक्रमातून व्यक्त होत होता. खासदार डॉ. हीना गावित, नवनिर्वाचीत नगरसेवक, धुळे शहरासह साक्रीतील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. त्याचवेळी भाजप कार्यालयापुढे रवींद्र उपाख्य गोटू जगताप यांना मारहाण झाली. ते प्रभाग क्रमांक अकरामधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पराभूत उमेदवार ताराबाई जगताप यांचे पुत्र आहेत.

भाजपच्या समर्थकांकडून मारहाण होत असल्याची माहिती मिळविल्यावर श्रीमती जगताप यांनी मुलगी माया पवार, पुतणी मोहिनी जाधव यांना घटनास्थळी पाठविले. तिथे मोहिनी जाधवचा मारहाणीत मृत्यू झाल्याची फिर्याद माया पवार यांनी दिली आहे. त्यांनी मनीष गिते, रमेश सरक, उत्पल नांद्रे यांच्यासह पाच ते सहा जणांवर गुन्हा दाखल केला.

भोसले यांच्यामागे ससेमिरा

फिर्यादीचे भाऊ गोटू जगताप जखमी झाल्याने ते उपचारासाठी रुग्णालयात बरे झाल्यावर त्यांनी पोलिसांकडे जबाब नोंदविला. त्यात सात जणांपैकी एक नाव ॲड. गजेंद्र भोसले यांचे आहे. ते प्रभाग चौदामधून भाजपकडून विजयी झाले आहेत. या पक्षातर्फे एकमेव त्यांचे नाव नगराध्यक्षपदासाठी निश्‍चित मानले जात आहे. असे असताना जगताप यांच्या जबाबात ॲड. भोसले यांचे नाव संशयित आरोपीच्या यादीत आल्याने साक्रीत खळबळ उडाली. ॲड. भोसले हे साक्री वकील संघाचे सदस्यही आहेत. या स्थितीत एलसीबीची तपास करताना तारेवरची कसरत होणार आहे.

साक्रीतून विजयी उमेदवार बेपत्ता

तपासातील कारवाईच्या भीतीने भाजपचे विजयी उमेदवार, काही पदाधिकारी, कार्यकर्ते बुधवारपासून बेपत्ता झाले आहेत. तपास यंत्रणा केव्हाही त्यांना जाबजबासाठी बोलावू शकते. चौकशी करू शकते. मात्र, संबंधित नॉट रिचेबल असल्याने त्यांना चौकशीला बोलविता येत नसल्याचे सांगण्यात आले. एकीकडे ॲड. भोसले यांचे नाव नगराध्यक्षपदासाठी अग्रभागी असताना भाजपचे बापू गिते यांनाही नगराध्यक्षपदाची संधी मिळावी असे त्यांच्या समर्थकांना वाटते आहे. त्यात त्यांचा मुलगा मनीष हाही संशयितांच्या यादीत समाविष्ट आहे.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com