Nashik Politics : नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रविवारी नाशिक शहरात गोदातीरी प्रचारसभा पार पडली. या सभेत फडणवीस यांच्यासह कुंभमेळामंत्री गिरीश महाजन व पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचीही भाषणे झाली. आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणातून नाशिककरांना काही आवाहन केलं.
पंकजा मुंडे म्हणाल्या, शूर्पणखेचे कान कापले म्हणून या नगरीला नाशिक असे म्हणतात. कुंभमेळा हा नाशिकच्या विकासाचा पाया आहे. त्यामुळे कुंभमेळ्यासाठी नाशिककरांना विकासाची भूमिका घ्यायची आहे. ही भूमिका घेणाऱ्यांमागे उभे राहण्याची गरज असून विकासाच्या आड येणाऱ्या विरोधकांना छाटण्याचे काम करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
मुंडे म्हणाल्या नाशिक ही महाराष्ट्राची देवभूमी आहे. या भूमीत प्रभू रामांचे वास्तव्य आहे. येथे हनुमानाचे जन्मस्थान आहे. आमचा पक्ष प्रभू रामांच्या विचारांवर चालणारा असून अशा या देवभूमीत देवाभाऊ कमळ घेऊन आले आहेत. येणाऱ्या कुंभमेळ्याचे व्यवस्थित नियोजन करायचे असेल, तर नाशिकचा महापौर भाजपचाच हवा.
मागच्या सिंहस्थ कुंभमेळ्यावेळी देखील देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, तर गिरीश महाजन पालकमंत्री होते. त्यांनी कुंभमेळ्याचे नियोजन चांगल्या पद्धतीने केले होते. आताही देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले असून, पुन्हा एकदा नाशिकमध्ये मोठा विकास होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मगच नवऱ्याला जेवण वाढा...
दरम्यान पंकजा मुंडे यांनी लाडक्या बहिणींनाही मिश्किल व अनोखे आवाहन केले. मतदानाच्या दिवशी सकाळी लवकर उठून देवपूजा करावी आणि घरातील कामे करावीत त्यानंतर घरातील सदस्यांसाठी विशेषतः नवऱ्यासाठी, स्वादिष्ट नाश्ता तयार करून ठेवावा. मात्र, तो लगेच खायला देऊ नका. आधी देवाभाऊच्या कमळाला मतदान करा, आणि मगच घरी परतल्यावर मी तुम्हाला खायला देईल असे नवऱ्याला सांगा.
कान गोष्टी...
दरम्यान व्यासपीठावर पंकजा मुंडे, देवेंद्र फडणवीस व गिरीश महाजन हे शेजारी-शेजारीच बसलेले होते. यावेळी त्यांच्यात काही कान गोष्टीही झाल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.