Dasara Melava Bhaktigad : भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांनी आज गोपीनाथ गडावरील आपल्या मेळाव्यात अनेक विषयांना स्पर्श केला. त्यात त्यांनी अनपेक्षितपणे मराठा आरक्षणाचा विषयदेखील घेतला. या विषयावर त्यांनी राज्य सरकारला इशारा दिला. (State Government Should take reservations issue seriously)
भाजपच्या (BJP) माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankja Munde) यांनी आज गोपीनाथ गडावर पारंपरिक दसरा मेळावा घेतला. त्यात त्यांनी समाजबांधवांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी राज्य सरकारला (Maharashtra Government) अप्रत्यक्ष इशारा दिला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सध्या राज्यभर मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणावरील आंदोलनाचा विषय अतिशय तापलेला आहे. आज राज्य सरकारने या विषयावर दिलेली चाळीस दिवसांची मुदत संपली आहे. त्यामुळे राज्य शासन काय निर्णय घेते, याबाबत उत्सुकता वाढत आहे. मात्र, राज्य शासनाने काहीही निर्देश दिलेले नाहीत. त्यामुळे या विषयावर राज्यभर उत्सुकता आहे.
हा धागा पडकून श्रीमती मुंडे यांनी देखील मराठा आरक्षणाचा विषय अतिशय गंभीर आहे. राज्यात या विषयावर नागरिक व समाज अतिशय संवेदनशील बनला आहे. त्याबाबत युवकांमध्ये खदखद आहे. त्याचबरोबर ओबीसी समाजातदेखील विविध विषयांवर मतप्रवाह आहेत. त्यांना याबाबत धास्ती आहे. या विषयावर अपेक्षाभंग झाल्यास तो सहन करण्याची तयारी या समाजाची नाही, असे त्या म्हणाल्या.
अनपेक्षितपणे त्यांनी हा विषय काढला. त्यातून त्यांनी स्वतःच्याच राज्य सरकारला संदेश देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या भाषणातील हा चर्चेचा विषय ठरला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.