Shivsena Nashik News : ठाकरे सेनेच्या दसरा मेळाव्याला नाशिकमधून मोठी रसद!

Nashik region will give Big backup for Thackeray Group Meeting-नाशिक, धुळे, जळगावमधून शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्यांनी केले मायक्रो प्लॅनिंग
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Shivsena Dasara Melava : शिवसेना ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी नाशिक आणि परिसरातून २० हजार स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नोंद केली आहे. त्यामुळे आज होणाऱ्या मुंबईच्या मेळाव्यातून शिंदे गटावर मात करण्याची शक्यता आहे. (Shivsena Thackeray Group`s foundation day Meeting will be Garnd)

आज मुंबईत (Mumbai) शिवसेनेच्या (Shivsena) ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) या दोन्ही गटांचे मेळावे होत आहेत. त्यासाठी दोन्ही गटांच्या नेत्यांनी जोर लावला आहे. मात्र नाशिक, धुळे, नंदुरबारमधून मोठी रसद ठाकरे गटाच्या मेळाव्याला मिळणार आहे.

Uddhav Thackeray
Balasaheb Thackeray Last Speech : थरथरत्या आवाजातच बाळासाहेबांनी घातली साद; माझ्या उद्धव, आदित्याला सांभाळा !

यासंदर्भात गेल्या दोन दिवसांपासून पदाधिकारी नियोजन करीत होते. आज सकाळी बहुसंख्य कार्यकर्ते रेल्वे, बसेस तसेच स्वतःच्या वाहनांनी मुंबईच्या दसरा मेळाव्यासाठी रवाना झाले. उपनेते सुनील बागूल, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गिते, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, जिल्हाप्रमुख विजय करंजकर आदींच्या उपस्थितीत सोमवारी याबाबत बैठक झाली, तर शिंदे सेनेच्या मेळाव्यासाठी पालकमंत्री दादा भुसे यांनी स्वतः बैठक घेतली होती.

ठाकरे गटाचा दसरा मेळावा पारंपरिक शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे. परंपरेप्रमाणे ठाकरे सेनेकडे मैदानाचा तात्पुरता ताबा मिळाला असला तरी शिंदे सेनेनेदेखील आझाद मैदानावर मेळाव्याची जोरदार तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही शिवसेनेच्या गटात कोणाकडे गर्दी अधिक ही स्पर्धा राजकीय प्रतिष्ठेची ठरणार आहे. त्यामुळे दोन्ही गटांनी त्यासाठी जोर लावला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्या पार्श्वभूमीवर ठाकरे सेनेचा मेळावा सोमवारी शालिमार येथील शिवसेना भवनामध्ये झाला. शिवसेनेतून बाहेर पडलेल्या गद्दारांमध्ये सुरू असलेली सुदोपसुंदी, अनेकांना स्वगृही परतण्याचे लागलेले वेध, नाशिकमध्ये उद्ध्वस्त करण्यात आलेला ड्रग्जनिर्मितीचा कारखाना आणि प्रकरणी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे आणि ना. शंभूराज देसाई त्यांच्यावर होत असलेले आरोप, राज्यातील ढासळलेली कायदा व सुव्यवस्था स्थिती, आमदार अपात्रताप्रकरणी निर्णय देण्यास विधानसभा अध्यक्षांकडून होत असलेला विलंब, महागाईने गाठलेला कळस, वाढती बेरोजगारी, केंद्र सरकारकडून तपास यंत्रणांचा होत असलेला गैरवापर आदी मुद्द्यांवर माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे समाचार घेतील अशी अपेक्षा आहे.

Uddhav Thackeray
Balasaheb Thackeray On BJP: जेव्हा बाळासाहेबांनी भाजपला म्हटलं...'रक्त पिणारी कमळाबाई'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com